**या गावात अस्वच्छता घाणीच्या दुर्गंधीने होते स्वागत* *हे गाव लय न्यार...... इथं अस्वच्छतेच वारं ..........*!

**या गावात अस्वच्छता घाणीच्या दुर्गंधीने होते स्वागत*  *हे गाव लय न्यार...... इथं अस्वच्छतेच वारं ..........*!

करकंब/ प्रतिनिधी

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर पासून अवघ्या काही वीस किमी अंतरावर वसलेल्या ऐतिहासिक प्राचीन धार्मिक व 11 संजीवन समाधी स्थळ असलेल्या करकंब नगरीत पंढरपूर हून करकंबकडे येताना करकंब ग्रामपंचायतने मुख्य रस्त्यालगत टाकलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍याने  रस्त्यावर आलेल्या कचऱ्याने आणि घाणीच्या साम्राज्यात व दुर्गंधीने येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांचे स्वागत होत आहे. याकडे करकंब ग्रामपंचायतचे पूर्णता दुर्लक्ष होत असले तरी गावातील नागरिकांना हे काय नवीन नाही. पण बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांचे अशा अस्वच्छतेने व दुर्गंधीने स्वागत होत असेल तर  गावातील अंतर्गत स्वच्छता कशी असेल हा विचार करून आलेला नातेवाईक गावाच्या बाहेरच्या बाहेर जातअसल्याची दृश्य पहावयास व  ऐकावयास मिळतात. त्यामुळे हे गावच लई न्यारं, इथं अस्वच्छतेचा आहे वारं. डेंगू मलेरिया अन साथीच्या रोगाने गाव झालं हैराण अशी ग्रामस्थांत चर्चा सुरू आहे.
 करकंब ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाते. यापूर्वी करकंब ग्रामपंचायतला महात्मा गांधी तंटामुक्त गाव तसेच सर्वात आधी डिजिटल मुक्त गाव हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विशेषता या पुरस्कारांची नोंद राज्य सरकार ने नोंद घेऊन विशेष अभिनंदनही केले होते. पण आता विकासाची स्पर्धा, किंवा गावाला पुरस्कार मिळवण्याची स्पर्धा कोणाकडून होताना दिसत नाही.अशी शोकांतिका करण्याची वेळ का आली? असही सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे .गावामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे .त्यात गावाबाहेर अशी अवस्था त्यामुळे बाहेर  येणारे-जाणारे आणि ग्रामस्थ या अस्वच्छते बाबत प्रचंड हैराण झाले आहेत .अशा अस्वच्छतेमुळे व घाणीच्या दुर्गंधीमुळे गावात डेंगू सदृश्य मलेरिया आणि साथीचा रोगाचा फैलाव झाला आहे. याकडेही ग्रामपंचायतचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे . याबाबत ग्रामपंचायतने जी खबरदारी घ्यायची होती ती आरोग्याची खबरदारी आज पर्यंत घेतली नाही. धुरळणी ,औषध फवारणी, स्वच्छता लोकांच्या आरोग्याबाबत काही ठोस पावले उचललीनाहीत.असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

चौकट

 करकंब ग्रामपंचायतची पूर्वीच्या कामगारांची यंत्रणा पूर्णता बिघडलेली असून आम्ही या कामगाराच्या बिघडलेल्या यंत्रणा सुरळीत करण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. पण मार्चपर्यंत बिघडलेली यंत्रणा पूर्णता निश्चित पणाने मार्गी लावणार.

                              तेजमाला शरदचंद्र पांढरे(सरपंच)

                          ,        करकंब ग्रामपंचायत करकंब.