*उद्योजक राजू खरे यांना पाठिंब्याचे सत्र सुरूच* *कुरुल कामती जिल्हा परिषद गट बौद्ध समाजाच्या चारशे ते साडेचारशे कार्यकर्त्यांनी दिले आतापासूनच समर्थन*

पंढरपूर/प्रतिनीधी
मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी पंढरपूरचे रहिवासी आणि मुंबई येथील उद्योजक राजू खरे यांनी मागील अनेक दिवसापासून मतदार संघातून आपली ताकद आजमावण्यासाठी
गावभेट दौरे सुरू ठेवले आहेत. यामधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातीलच एक भाग म्हणून आज कुरुल, कामती या जिल्हा परिषद गट, आणि बौध्द समाजातील चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी मोहोळ चे भावी आमदार म्हणून राजू खरे यांना पाठींबा दिला आहे.
पंढरपूर भागातून राजू खरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील निवडणुकीपासून ते मोहोळ पंढरपूर विधानसभा लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे तेव्हापासूनच दांडगा जनसंपर्क वाढविला आहे. मोहोळ मतदार संघातून दौरे करीत असताना सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेत त्यांच्या नावाची क्रेझ निर्माण झाली आहे.
उपेक्षितांचा कैवारी, सर्वसामान्य जनतेचा तारणहार, आपल्या मातीतील माणूस अशी नवीन ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा आहेत पण त्याहीपेक्षा सामाजिक व मानसिक गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यावर खरे यांनी आपले लक्ष्य निर्धारित केले आहे.
यावेळी शिवसेना मोहोळ विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रकाशदादा पारवे , (शिवसेना उत्तर सोलापूर तालुका प्रमुख सुधीर गोरे, शिवसेना सोलापूर जि उप दादासो पवार , माजी, जि.प. सदस्य नरखेड चे दादासाहेब कर्णवर,मा. समाधान खंदारे (शिवसेना नरखेड गट), उमाकांत करडे ( सोलापूर शिवसेना उपप्रमुख), अमर सोनवले (उप ला शिवसेना तालुकउप प्रमुख मोहोल शिंदे गट) ,. लक्ष्मण राठोड (सरपंच सेवालाल नगर मार्डी विभाग प्रमुख शिवसेना ), सागर पवार (माजी गट प्रमुख शिवसेना नरखेड ), मा. समर्थ बिराजदार (युवा सेना सचिव सोलापूर शहर) ,शहाजी केदार ग्रामपंचायत सदस्य कोठळी) , सतीश जाधव (शिवसेना शाखाप्रमुख येनकी,)
विक्रम कीर्त (युवा नेते कोरोली),महादेव माने (वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मोहोळ), संजय कांबळे (ग्रामपंचायत सदस्य) जामगाव, समाधान सोनवले (अरबळी), माळाप्पा कांबळे( येनकी), विश्वास गायकवाड (रिपब्लिकन चायना सचिव) शिंगोली, गौतम तूपलोडे (अध्यक्ष मानव परिवर्तन संस्था कोरोली), शांताराम सोनवले( बहुजन पार्टी अध्यक्ष सोहळे), महादेव ऐवळे, शहाजी कीर्त (भ्रष्टाचार विरोध समिती तालुका अध्यक्ष मोहोळ), शंकर माने( कैकाडी समाज अध्यक्ष बेगमपूर) , आदित्य भोई (भोई समाज अध्यक्ष बेगमपूर), राहुल अलदर (धनगर समाज अध्यक्ष), अण्णा कीर्त (कोरोली,), राजेश चंदनशिवे सर (विरांगणा बहुउद्देश सेवा संस्था अध्यक्ष),सोनूदादा शिंदे यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.