करकंब ग्रामपंचायत कार्यालयात कर्मयोगी श्रीमंत स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पद्मश्री श्री .पोपटराव पवार यांच्या कडून अभिवादन.*

करकंब / प्रतिनिधी.
:- येथील करकंब ग्रामपंचायत कार्यालयात कर्मयोगी श्रीमंत स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमेस पद्मश्री पोपटराव पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी करकंब ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता पद्मश्री श्री पोपटराव पवार यांचा विशेष सन्मान व सत्कार उपसरपंच श्री आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विविध गावचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी डॉक्टर श्री सतीश चव्हाण, व कर्मचारी , ग्रामस्थ उपस्थित होते.