*करकंब विभागात जास्तीत जास्त सेवा सुविधा देणार-माहेश्वरी प्रसाद*

करकंब /प्रतिनिधी
करकंब येथील भारतीय स्टेट बँकेच्या जळोली चौकातील स्थलांतर शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर -माहेश्वरी प्रसाद यांनी शाखा उद्घाटन प्रसंगी व्यापारी, उद्योजक, ग्रामस्थ व शेतकऱ्यांसी सुसंवाद साधला . यावेळी त्यांनी जुन्या बँकेच्या ठिकाणी व या शाखेमध्ये चांगल्या सेवा सुविधा देण्यात साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी राजीव गुप्ता असिस्टंट जनरल मॅनेजर क्षेत्रीय व्यवसायकार्यालयसोलापूर,दिनेश झहा चीफ मॅनेजर क्रेडिटविभाग,संतोष पाटील चीफ मॅनेजर सेल्स विभाग,धनंजय होनमाने झोनल प्रेसिडेंटऑफिसर असोसियन, सेवा प्रबंधक-अमोल डावरे,कृषी सहाय्यक- गणेश कोल्हे, कॅशियर- संकेत पाटील,
सहाय्यक - मनोज निंबाळकर,
सुरक्षारक्षक- नागनाथ मोरे,BDM सागर भोसले, Fos एकझिक्युटिव्ह - शुभम हेंद्रे,
BRE - निलेश शिंदे,बालाजी माने
शुभम मांजरे,आधार ऑपरेटर -किरण गुळमे, पांडुरंग चे मा. व्हाईस चेअरमन -नरसप्पा देशमुख, प्राचार्य-किसन सलगर,मिथुन चंदनशिवे सर,अमोलदादा शेळके,गणेश शिंदे, धोंडीराम काशीद, सचिन हराळे, अशोक सिंह देशमुख, समाधान गुंड, पत्रकार- राजेंद्र करपे, मनोज पवार, नितीन खाडे व्यापारी, शेतकरी, युवा, व महिला वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समाजसेवक-सचिन शिंदे यांनी भारतीय स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर - राजेश गुप्ता , शाखाधिकारी - संदीप झोडगे "करकंबच्या नागरिकांसाठी CDM कॅश डिपॉझिट मशीन व नवीन दोन एटीएम सोमवार पेठ" "करकंब शहरांमध्ये" सुरू करण्याची मागणी केली. समाजसेवक- सचिन शिंदे यांच्या या मागणीस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत "करकंब येथील सोमवार पेठ " येथे निश्चितपणे याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँकेत अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने कर्मचाऱ्यांची भरती करावी. शैक्षणिक कर्ज , युवकांसाठी कर्ज, उद्योजकांना कर्ज, सबसिडीची कर्ज विविध कर्जाअंतर्गत त्वरित कर्ज व सर्व सेवा सुविधा जलद गतीने मिळावी अशी मागणी यावेळी व्यक्त केली.
*चौकट*
सीडीएम मशीन मुळे 24 तास कॅश डिपॉझिट सेवा सुरू राहणार असल्याने करकंब शहरातील नागरिक, व्यापारी यांची होणारी गैरसोय दूर होऊन ही सेवा सुविधा त्वरित सुरू झाल्यास जलद गतीने याचा करकंबकरांना निश्चितपणे लाभ होईल.
समाजसेवक -सचिन शिंदे