अभिजीत पाटील यांच्या मागणीची सरकार ने घेतली दाखल भीमा नदीकाठचा वीज पूरवठा पूर्ववत सुरू जिल्हाधिकारी यांचेकडून वीज वितरणचे अधीक्षक अभियंता यांना लेखी आदेश

पंढरपूर/प्रतिनीधी
विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला होता. केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण तो पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले होते.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची भीषण टंचाई आहे. यामुळे पिण्याचे पाणी सह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब चेअरमन अभिजीत पाटील यांच्या लक्षात आली होती.
सोलापूर शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडले आहे. त्यामुळे भीमा नदीकाठचा वीज पुरवठा केवळ दोन तास होता.मात्र हे पाणी नदीत असूनही याचा शेतकऱ्यांना फायदा नव्हता. त्यामुळे ही बाब अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लेखी निवेदनाद्वारे मांडली होती. या निवेदनाची तात्काळ दखल घेत संबधित अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आज गुरुवारी 23मे रोजी होऊन जिल्हाधिकारी यांनी भीमा नदीकाठचा वीज पुरवठा पूर्ववत आठ करण्याबाबत वीज वितरण विभागाचे सोलापूर अधीक्षक अभियंता लेखी आदेश काढले असून वीज पुरवठा सुरू झाला आहे.
वरील आदेश मिळाल्याने शेतकऱ्यांमधून मोठ समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा शब्द उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ पूर्ण केल्याचेही अभिजीत पाटील समर्थक यांचेमधून मोठ आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
अभिजीत पाटील हे नेहमीच विविध समस्यावर मात करण्यासाठी झटणारे नेते म्हणून परिचित झाले आहेत. आता तर सत्ताधारी भाजपला त्याची साथ असल्याने यापुढेही त्यांच्या शब्दाला मोठ वजन प्राप्त होणार आहे. यामुळे आता अनेक समस्या शासन दरबारी मांडणारा खमका नेता या पंढरपूर,मंगलवे,माढा, सह विविध भागाला मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
अशा प्रकारचे प्रश्न खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी यांनी जलद मार्गी लावणे आवश्यक असते. मात्र याचा विचार मात्र चेअरमन अभिजीत पाटील करीत आहेत. यामुळे जनतेला पाटील यांचे कार्य गळी उतरत आहे. हे मात्र नक्की.