*खा. शरद पवार सोमवारी येणार पंढरीत* *डॉ निकम यांच्या हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती*

*खा. शरद पवार सोमवारी येणार पंढरीत*
*डॉ निकम यांच्या हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती
पंढरपूर/प्रतीनीधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांचा सोमवार दिं 23ऑक्टोंबर रोजी पंढरीत दौरा आहे. यामध्ये सुप्रसिद्ध अर्थोपेडिक व जॉइंट रीप्लेसमेंट सर्जन डॉ प्रशांत निकम यांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या टुयलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा खा.पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या हॉस्पिटलचे लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील असणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आ. समाधान आवताडे, आ. प्रशांतराव परिचारक, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंतसर, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, बी आर एस पक्षाचे नेते भगीरथ भालके, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष ऍड गणेश पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव, पंढरपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, कॉटेज हॉस्पिटल आरोग्य अधिकारी डॉ जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले, आय. एम ए. चे अध्यक्ष डॉ सुनील कारंडे, निमाचे अध्यक्ष डॉ मनोज भायगुडे, मातोश्री श्रीमती पुष्पलता पांडुरंग निकम आदी दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
हा लोकार्पण सोहळा सोमवारी दुपारी साडे बारा वाजता होणार आहे. यासाठी सर्व नागरिकांनी केबीपी चौक ते जुना अकलूज रस्ता या दरम्यान उपस्थित राहावे असे आवाहन डॉ प्रशांत निकम यांनी केले आहे.