*1 मे ची करकंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा खुलेआम जनतेतून होणार का.....?* *नगरपंचायत, विकासाचे मुद्दे व भ्रष्टाचारावरून विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष.* *करकंब ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी ठरणार....!* *ग्रामसभेला अधिकाऱ्यांची दांडी...

*1 मे ची करकंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा खुलेआम जनतेतून होणार का.....?*  *नगरपंचायत, विकासाचे मुद्दे व भ्रष्टाचारावरून विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष.*  *करकंब ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी ठरणार....!*  *ग्रामसभेला अधिकाऱ्यांची दांडी...

करकंब /प्रतिनिधी:-

नुकतेच पंचायतराज दिनानिमित्त दिनांक 24 ते 29 एप्रिल दरम्यान शासनाने ग्रामपंचायतना ग्रामसभा आयोजित करण्यासाठी सांगितले होते. या ग्रामसभेमध्ये केंद्र शासनाच्या मिळत असलेल्या विविध योजनांची माहिती तसेच शेतकऱ्यांना पीएम किसान कार्ड संदर्भात अत्यावश्यक माहिती व व इतर शासनाने सूचित केलेल्या माहिती या ग्रामसभेतून लोकांपर्यंत पोहोचणार होती. ग्रामसभा झाली तीही कागदावरच झाली.. त्यामुळे दिनांक 1 मे रोजी करकंब ग्रामपंचायतची होणारी ग्रामसभा ही खुलेआमपणे जनतेतून घ्यावी. अशी मागणी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
या ग्रामसभेसाठी ग्राम विकास अधिकारी यांनी गावातील तलाठी, मंडलाधिकारी (सर्कल), मंडळ कृषी अधिकारी, पोलीस अधिकारी, कनिष्ठ अभियंता विज महावितरण, पशुवैद्यकीय अधिकारी , उपविभाग आधिकारी भीमा पाटबंधारे, बांधकाम  उपविभाग अधिकारी, संबंधित अधिकारी अथवा ज्या त्या विभागातील प्रतिनिधींना या ग्रामसभेसाठी सुचित करून गावातील लोकांच्या असलेल्या समस्यांचे निराकरण या ग्रामसभेच्या माध्यमातून व्हावे. या उद्दिष्टाने उपस्थित राहणे गरजेचे आहे.यासाठी ग्रामविकास यांनी संबंधित विभागाचे अधिकारी अथवा त्यांच्या प्रतिनिधींना या ग्रामसभेसाठी लेखी कळवणे गरजेचे आहे.
ग्रामसभा ह्या शासनाच्या मिळत असलेल्या विविध योजना संदर्भात तसेच आलेल्या विविध योजना , आलेला निधी याबाबत विचार विनिमय करून  लोकांशी थेट संवाद साधून संवादातून विकासाची भूमिका ग्रामसभा घेणे आवश्यक असताना या ग्रामसभा ग्रामपंचायत मध्ये घेतल्या जात असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामसभा घेण्यापूर्वी ग्रामस्थांना पूर्व सूचित करण्यासाठी गावातून दवंडी देणे आवश्यक असताना आज पर्यंत ग्रामसभेची एकही दवंडी दिली नसल्याची ग्रामस्थांमधून चर्चाकेली जात आहे.त्यामुळे शासनाच्या लाभापासून अनेक जण वंचित राहत असल्याची खंतही यावेळी व्यक्त केली.
दिनांक 1 मे रोजी च्या या होणाऱ्या ग्रामसभेत करकंब नगरपंचायत, तसेच मागील दहा पंधरा वर्षाच्या काळातील भ्रष्टाचारा संबंधी गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त व इतर ठिकाणी केलेल्या तक्रारी बाबत काय झाले..? याबाबतची उत्सुकता ग्रामस्थांना लागून राहिली असून  विरोधक काय भूमिका घेतात. याकडे ग्रामस्थांचे ही लक्ष लागून राहिले आहे.
करकंब ग्रामपंचायत मध्ये 17 सदस्य संख्या असून यामध्ये नऊ महिला या विद्यमान महिला सदस्य तर आठ जण पुरुष असल्याने आज पर्यंत ची ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात येते ‌. ती ही दवंडी न देता.. त्यामुळे ही ग्रामसभा जनतेतून खुलेआमपणे घेण्याची मागणी ग्रामस्थांतून होत असल्याने दिनांक 1 मे ची ग्रामसभा ही वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.