*करकंब येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने विविध सामाजिक  कार्यक्रमाचे आयोजन.....!*

*करकंब येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने विविध सामाजिक  कार्यक्रमाचे आयोजन.....!*

करकंब /प्रतिनिधी :

-करकंब येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक- 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी -साडेनऊ वाजता श्री विठ्ठल मंदिर शेजारी, कानडे गल्ली करकंब येथे संपन्न होणार आहे. त्याचबरोबर या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार व सन्मान सोहळा व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन करून प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ  आयोजित करण्यात आलेला आहे.
    या जयंतीचे औचित्य साधून सुप्रसिद्ध व्याख्याते राष्ट्रीय पुरस्कार विजेते, सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ ,व्याख्याते-स्वागत तोडकर यांचे अनमोल असे व्याख्यान सोमवार दिनांक -५ जून रोजी सुवर्ण गार्डन मंगल कार्यालय मोडनिंब रोड करकंब येथे सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आले आहे तरी याचा सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.