*कोणाच्या ही दादागिरीला व दडपशाहीला घाबरणार नाही*- *करकंब येथील विरोधी पक्षनेते राहुलकाका पुरवत.हे गाव नगरपंचायत करण्यासाठी संघर्षाचे तयारीत*. *विरोधी पक्षनेते राहुलकाका पुरवत राजकारणात जोमात...!*

करकंब /प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील करकंब ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या सभागृहात माझ्यासह माझे बरोबर असलेले विविध प्रश्नांची व मूलभूत सुविधांची समस्या सोडवण्यासाठीच या पवित्र मंदिरात ग्रामस्थांनी बसविले आहे. आज विजयादशमी दसरा उत्सव असल्याने करकंब मधील सर्वच सामान्य नागरिक, शेतमजूर ,शेतकरी ,व्यापारी ,युवा वर्ग ,विविध संघटनांचे पदाधिकारी, विशेषता महिला भगिनी ,माता ,विशेष करून आमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वच करकंब वासियांचे या माध्यमातून विजयादशमी चे औचित्य साधून करकंब ग्रामपंचायतचा एक विरोधीपक्षनेते नेता व माझे सहकारी असलेले सर्व सदस्य व माझ्या बरोबर असलेले सहकारी यांच्याकडून शुभेच्छा व्यक्त करून आपल्या करकंब वासियांचे विशेष आभार मानून यापुढेही या विजयादशमीच्या निमित्ताने पाच वर्ष आपल्यासारख्या सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचा संकल्प केला असल्याचे विरोधी पक्षनेते राहुल काका पुरवत यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते म्हणून यापुढेही कोणाच्या दादागिरीला व दडपशाहीला घाबरणार नाही. जोपर्यंत करकंब ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष व लढा चालूच राहील. आमचा हेतू हा प्रामाणिक पणे आहे. आणि लोकांना विकास हवा आहे. करकंब ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यास मोठ्या प्रमाणात कायापालट करता येईल. करकंब मध्ये अनेक युवक वर्ग सुशिक्षित बेरोजगार असून ही या भागात एमआयडीसी सारखा प्रकल्प नाही. त्यासाठीही वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करू.चांगले रस्ते, शुद्ध पाणी ,विज आरोग्य ,स्वच्छता , उपबाजार समिती साठी तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या असलेल्या विविध योजना सामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. पण पाच वर्ष सक्षम पणे विरोधी पक्षनेते म्हणून कुणाच्याही दादागिरीला व दडपशाहीला घाबरणार नाही. आमच्याकडे प्रचंड संयम आहे. विजयादशमी चे औचित्य साधून करकंब गावाला लागलेली वाळवी येत्या पाच वर्षात सर्व सहकाऱ्यांना बरोबर व सामान्य जनतेला विश्वासात घेऊन स्वच्छ करणार असल्याचे ठामपणे विरोधी पक्ष नेते राहुल काका पुरवत यांनी सांगितले.
करकंब च्या सर्वसामान्य जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे.या सामान्य जनतेसाठी अहोरात्र न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे सांगून विरोधी पक्ष नेते राहुल काका पूरवत यांनी करकंब वासियांना शुभेच्छा व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.