*रविवारी युवराज पाटील गटाची विचार विनिमय बैठक* *आगामी राजकारणाची दिशा करणार स्पष्ट*

*रविवारी युवराज पाटील गटाची विचार विनिमय बैठक* *आगामी राजकारणाची दिशा करणार स्पष्ट*

पंढरपूर/प्रतिनिधी
 श्री विठ्ठल सह साखर कारखाना निवडणुकीत तालुक्यात  आपले स्वतंत्र  अस्तित्व सिद्ध करून दाखविलेल्या आण्णा - भाऊ परिवाराची विचार - विनियम बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अमरजित पाटील यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल आण्णा - भाऊ शेतकरी विकास पॅनलची विचार विनिमय बैठक रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी,सकाळी १० वाजता,श्री विठ्ठल हाॅस्पीटल,पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर पदाधिकारी - कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी व आगामी दिशा ठरवण्यासाठी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भुमिका जाणून घेण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर बैठकीस पंढरपूर तालुक्यासह,पंढरपूर शहरातील आण्णा-भाऊ परिवाराच्या सर्व विविध संस्थाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थितीत रहावे.असे आवाहन युवराजदादा पाटील,ॲड.दिपक पवार,ॲड.गणेश पाटील यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.