*नागेश फाटे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला झाले वर्ष पूर्ण*   *व्यापाऱ्यांना मिठाई वाटप करून साजरा केली वर्षपूर्ती*   *राष्ट्रवादीचे नेते अन कार्यकर्त्यांनी केक कापून केला पहिला वाढदिवस*

*नागेश फाटे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला झाले वर्ष पूर्ण*    *व्यापाऱ्यांना मिठाई वाटप करून साजरा केली वर्षपूर्ती*   *राष्ट्रवादीचे नेते अन कार्यकर्त्यांनी केक कापून केला पहिला वाढदिवस*

पंढरपुर /प्रतिनिधी


           राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष  नागेश फाटे यांच्या पदभार स्विकृतीच्या वर्षपुर्ती दिनी व्यापार वर्गाला या विभागाच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली. तर स्व .आ .भारत  भालके यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केक कापून पहिला वाढदिवस साजरा केला आहे.

 उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले . नागेश फाटे यांच्या सहकार्यांनी कार्यालयात हि वर्षपुर्ती साजरी न करता पंढरपुर शहर व ग्रामीण भागातील विविध व्यवसाईकांसमवेत हि वर्षपुर्ती साजरी करण्यात आली .

मागील वर्षभरात नागेश फाटे यांनी आपल्या विभागाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीकरण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला होता. या बाबतची कार्य अहवालही पक्षाचे नेते खा .शरद पवार, अजितदादा पवार, जयंतराव पाटील ,सुप्रियाताई सुळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्याकडे पोहचविला होता. त्यावेळी नागेश फाटे यांच्या पक्ष कार्यावर वरील नेतेमंडळी नागेश फाटे यांना शाबासकी दिली होती.
    गेल्या एक वर्षापासुन प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी महाराष्ट्र चा दौरा करुन दोन लाखाहुन अधिक व्यापारी आणि उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडुन दिले आहेत . शिवाय अनेक नवतरुण व्यवसाईक उभा करण्याचे कांम त्यांनी केलेले आहे .
                     आज प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांची व्यापारी वर्गात वाढती लोकप्रियता पाहता निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला तळागाळात व लोकसमुहात ते पोहचवतील आशी एकंदरीत त्यांची कार्याची शैली आहे . त्यांनी आपली वर्षपुर्ती व्यापा-यांसमवेत साजरी केल्याने व्यापारी वर्गाने अभिनंदन करीत  भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या आहेत.


वरील केक कापुन साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगीमा भगिरथदादा भालके ,दिलीप बापु धोत्रे,अरुणभाऊ कोळी,किरण घाडगे ,नगरसेवक प्रशांत शिंदे,नगरसेवक राहुल साबळे , नगरसेवकबालाजी मलपे ,नगरसेवक नागेश गंगेकर , नगरसेवक प्रताप गंगेकर ,नगरसेवक महादेव धोत्रे ,नगरसेवक महम्मद वस्ताद , मनसे नेते शशिकांत पाटिल , सुहास भाळवणकर , तालुका अध्यक्ष राहुल पाटिल , सचिव श्रीकांत शिंदे , पंढरपुर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदिप मांडवे , अमर सुर्यवंशी , शुभांगी भुईटे ,सहकार शिरोमणी वसंतराव काळे स सा कारखान्याचे संचालक मा मोहन नागटिळक, सुधाकर कवडे , राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव मा कल्याण कुसुमडे, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा आण्णा नागटिळक, युवराज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष मा उमेश सासवडकर, गादेगावचे उपसरपंच मा गणपत मोरे, मनसे अध्यक्ष अनिल बागल,अनिल नागटिळक,संजय बागल, सतीश बागल, विनोद बागल,आभिमान पवार,शांतिनाथ बागल, डॉ रमेश फाटे, सौदागर गिड्डे,उमेश फाटे, निवृत्ती पाटील, सलीम सय्यद, विकास घाडगे, सोमनाथ सातपुते, ओंकार फाटे,शुभम फाटे , सोमनाथ चव्हाण, संदीप राय, श्रीधर ताकतोडे आदी उपस्थित होते.

दिवसभरात अनेक व्यापाऱ्यांच्या व्यवसाय ठिकाणी नागेश फाटे यांनी समक्ष जाऊन मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी व्यापारी व व्यवसाईक संपादक पत्रकार  शिवाजी शिंदे  महालिंग दुधाळे,संतोष बाबर,ज्ञानेश्वर बनसोडे ,दत्ता दहिवडकर,शाहाजीराऊत,अविनाशकाळेविनायकचव्हाण,विशालगांधी,सोमनाथ गाजरे ,डाॅ. अभिजीत नामदे,धनंजय घोडकेबशीरशेख,सोमनाथ शिंदे,आदींनी शुभेच्छा दिल्या.