*सोलापूर नमो विकास रथाचे श्रीकांत भारती यांचेकडून कौतुक* *राजेश मुगळे यांचे नाव सोलापूरमधून आघाडीवर*

पंढरपूर/प्रतिनीधी
सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेश मुगळे यांनी मोदी यांच्या विकासाची संकल्पना नमो विकास रथाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचे महान कार्य केल्याचे वक्तव्य भाजपा महाराष्ट्र निवडणूक प्रमुख तथा सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाची गंगोत्री जनतेपर्यंत पोहचविणे महत्वाचे आहे. मोदी यांनी देशाचा चौफेर विकास साधला आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांना मिळाला आहे. याचा लोकांना विसर पडू नये, याची जाणीव होण्यासाठी नमो विकास राथाच्या माध्यमातून गावोंगावी विचार पोहचवीण्याचे महान कार्य लोकसभा मतदार संघांचे इच्छुक उमेदवार राजेश मुगळे यांनी केले आहे. यामुळे
राजेश मुगळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. मुगळे यांचे वडील निजनींगप्पा मुगळे यांनीही जनसंघांचे कार्य केले आहे .आजही मुगळे हे आपल्या वडिलांचे कार्य पुढे चालवत आहे. राजेश मुगळे हे भूमिपुत्र आणि जातीचा दाखला असे उमेदवार आहेत. यामुळे यांनाच उमेदवारी मिळावी. अशी मागणी जनतेतून होत आहे.
यावेळी राजेश मुगळे शिवलाल राठोड, जनसंघांचे कार्यकर्ते नितीन कवठेकर, वीरेंद्र उत्पात, आदी उपस्थित होते.