*एका संचालकांचा तीन  वेळा झाला  सत्कार...*...*आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोण -कोण करणार जय जय कार......!*

*एका संचालकांचा तीन  वेळा झाला  सत्कार...*...*आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोण -कोण करणार जय जय कार......!*


 *करकंब /प्रतिनिधी*-

नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत संचालक पदी जिल्हा परिषद सदस्य रणजीत सिंह शिंदे यांची निवड झाल्यानंतर पंढरपूर व माढा तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या करकंब येथील गाव पुढाऱ्यांनी नूतन संचालक रणजीत सिंह शिंदे यांच्या निवडीबद्दल सत्काराचा सपाटा सुरू केला. एका संचालकांचा गावातील वेगवेगळ्या तीन गटानी सत्कार केल्यामुळे करकंब व करकंब सह 42 गावातील लोकातून आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणकोण जय-जयकार करणार अशी चर्चा होत आहे.
  माढा -पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांचे  जिल्हा परिषद सदस्य आणि नूतन दूध उत्पादक संचालक रणजीत सिंह शिंदे हे चिरंजीव आहेत. या नूतन संचालक पदी निवड झाल्यानंतर गावातील प्रमुख नेतेमंडळींनी निमगाव या त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. विशेष म्हणजे या सत्कारा मागे दडलय काय? अशीही चर्चा होत आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक ही पक्षीय नव्हती, हे सर्वांना ठाऊक आहे. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थानिक लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांची आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर लढवणार का? अशी राजकीय जाणकार तून चर्चा केली जात आहे.सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुकीचे वारे वहात असल्याने करकंब जिल्हा परिषद गट जिल्हा  जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांचा बालेकिल्ला असलेला हा गड भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे माढा पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यांनाही या करकंब जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये पक्षश्रेष्ठींना आपले वर्चस्व दाखवावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
  नूतन संचालक रणजित सिंह शिंदे यांचा प्रथमता सत्कार सत्ताधारी असलेल्या आदिनाथ देशमुख मित्र परिवाराच्या वतीने तर दुसरा सत्कार विरोधी पक्षनेते राहुल काका पुरवत व राजाभाऊ देशमुख मित्रपरिवार यांच्या वतीने आणि तिसरा सत्कार अजित्सिंह देशमुख मित्रपरिवार यांच्या वतीने केला असल्याचे सोशल मीडियात गेल्या दोन दिवसात सातत्याने व्हायरल झाल्याने याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.