*पंढरीत भिम जयंतीसाठी जोरदार तयारी!*  *विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आयोजित जयंती समितीच्या स्वागताध्यक्षपदी भाई नितीन काळे

*पंढरीत भिम जयंतीसाठी जोरदार तयारी!*   *विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आयोजित जयंती समितीच्या स्वागताध्यक्षपदी भाई नितीन काळे

 पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरीत भिम जयंतीसाठी जोरदार तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. यामध्ये  विस्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आयोजित जयंती समितीच्या स्वागताध्यक्षपदी भाई नितीन काळे करण्यात आली आहे.

  डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  पंढरपूर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक डि राज सर्वगोड यांनी समितीच्या बैठकीत वरील निवड जाहीर केली आहे.  शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे  झालेल्या निवडीनंतर सत्कार संपन्न झाले.
 यावर्षी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात सामाजिक उपक्रम घेऊन साजरी करण्यात येणार आहे. पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी  साजरी केली जाते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे साधेपणाने साजरी करण्यात आली होती.
 डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे काम हे आदर्श घेण्यासारखे असुन महाराष्ट्र भर प्रतिष्ठानच्या माध्यमातून  नगरसेवक डि राज सर्वगोड गोरगरीब जनतेला मदत करत आहेत. 
 भाई नितीन काळे यांचे सामाजिक काम पाहुनच  ही जबाबदारी देण्यात आली आहे. असे नगरसेवक डि राज सर्वगोड  यांनी सांगितले. नितीन काळे यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या स्वागताध्यक्ष पदि निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतुन कौतुकांचा वर्षाव होत आहे. 
नितीन काळे यांनीही बोलताना  सांगितले कि, माझ्यावर खुप चांगली जबाबदारी अध्यक्ष डि राज सर्वगोड  यांनी सोपावली आहे. ती यशस्वीपणे पार पाडेल व यावर्षीची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ही सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही साजरी करून, एक वेगळा आदर्श निर्माण करून देऊ .असेही  सांगितले. या जयंतीच्या निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळ्याचेही सालाबादप्रमाणे यंदाही उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे असेही डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डि राज सर्वगोड  यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षपदी सुरेश बापु नवले व अनेक जणांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. यावेळी निवडीच्या वेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी    मार्गदर्शक  सुदाम गायकवाड सर, डि राज सर्वगोड,  दिपक चंदनशिवे,   राजेंद्र कुमार बुध्याळ सर, मोरे साहेब व अनेक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते....