*आ.समाधान आवताडे यांचा पंढरपूर भागासाठी संपर्कही वाढला !* *आमदार यांच्या भेटीसाठी  या भागातील नागरिकांची संपर्क कार्यालयात  लागली गर्दी वाढायला ** *पंढरपूरच्या  जनतेला अल्पावधीतच मिळू लागला कामाबद्दल  मोठा विश्वास*

*आ.समाधान आवताडे यांचा पंढरपूर भागासाठी संपर्कही वाढला !*  *आमदार यांच्या भेटीसाठी  या भागातील नागरिकांची संपर्क कार्यालयात  लागली गर्दी वाढायला **  *पंढरपूरच्या  जनतेला अल्पावधीतच मिळू लागला कामाबद्दल  मोठा विश्वास*

 पंढरपूर:-प्रतिनिधी
 
पंढरपूरच्या जनतेला एक सवयच लागून गेली होती की, कोणतीही समस्या निर्माण झाली की लोकप्रिय ठरलेले आमदार भारतनाना यांचे थेट संपर्क कार्यालय गाठायचं अन तिथं आपल्या अडचणींवर मार्ग काढायचा. त्या जाण्यामध्येही पूर्णतः विश्वास होता, म्हणूनच त्याठिकाणी कोणतेही गाऱ्हाणे घेऊन जाण्याची एक प्रथा पडली होती.  त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण होईल असे वाटत होते. मात्र ही उणीव भरून काढण्यासाठी आता आ. समाधान आवताडे यांनीही  या भागातील संपर्क वाढविला असून, जनतेच्या मनातही हळूहळू त्यांच्याबद्दल विश्वास वाढू लागल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहे

.


    पंढरपूर आणि मंगळवेढा भागातील जनतेला आमदार हा सहजासहजी भेटू शकतो आणि आपली गाऱ्हाणी आपण बिनधास्थपणे मांडू शकतो हे आ भारत भालके यांनी मागील 11 वर्षात दाखवून दिले होते, त्यामुळे एखादया कोणत्याही घटकावर शासकीय यंत्रणेकडून त्रास होत असेल तर भालके  यांच्याकडून संबधित विभागाचे अधिकारी यांना थेट संपर्क केला जाऊन तो अन्याय थांबविला जात होता. यामध्ये रिक्षा चालक यांना पोलिसांकडून होणारा त्रास, अतिक्रमित  छोटे व्यापारी यांना नगरपालिकेच्या प्रशासनाकडून होणारा त्रास, भागातील विजेचा, रस्त्याचा, तहसील, प्रांत, पाटबंधारे, आदी अनेक कार्यालयात थेट जनतेसमोर फोन लावून त्यांना न्याय देण्याची पद्धत होती, तीच सवय या भागातील जनतेला लागली आहे. त्याच धर्तीवर आता आ. समाधान आवताडे यांनी आपले संपर्कासाठी वेळ वाढवून ,आपले दौरेही वाढविले आहेत. त्यामुळे आ. आवताडे यांच्या संपर्क कार्यालयाकडेही विश्वासाने आपल्या समस्या मांडण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.


    या भागातील अनेक ग्रामपंचायत मधील विविध विकास कामांना निधी उपलबद्ध करून मिळावा म्हणून आता थेट आ. समाधान आवताडे यांना पत्र देण्यासाठी गावोगावचे सरपंच, सदस्य, भेटून मागणी करू लागले आहेत, या मागणीलाही आ. आवताडे यांच्याकडून हिरवा कंदील मिळू लागल्यामुळे आता पंढरपूर भागातून गल्लोगल्ली आणि गावोगावी आ. समाधान आवताडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.


   अत्यंत संयमी आणि आदराने जनतेला बोलण्याची पद्धत, आणि बोललेला शब्द पेलायची धमक आ. आवताडे यांच्यामध्ये असल्याने त्यांच्यावर पंढरपूर भागातील जनता आपोआपच फिदा होऊ लागल्याने येणाऱ्या काळात अनेक लोकांना न्याय देऊन विविध भागांतील विकास कसा साधायचा यासाठी त्यांच्या सल्लागारामार्फत आ. यांनी आपले स्वातंत्र्य बस्थान बसविण्यासाठी दौरे वाढविले असल्याचे दिसून येत आहे.
  आ. आवताडे हे अत्यंत कष्ट करून एक मोठे उद्योजक म्हणून नाव आहे, असे असल्यामुळे त्यांना एखादया अडचणींवर कशी मात करावी लागते आणि किती नम्रतेने बोलावे लागते याची जाण आहे. त्यामुळे आलेल्या जनतेला आ. भालके यांच्याप्रमाणे बोलून कामे मार्गी लावत असल्याचे दिसत आहेत.