*मनसे मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यांतून ५ हजार कार्यकर्ते जाणार*! *जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांची माहिती*

*मनसे मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यांतून ५ हजार कार्यकर्ते जाणार*!  *जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांची माहिती*

पंढरपूर/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शनिवारी मुंबईच्या दादर येथील शिवतीर्थावर पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी सोलापूर जिल्ह्यातून जवळपास पाच हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी दिली आहे.
 कोरोनाच्या सावटाखाली मागील दोन वर्षात मोठ्या मेळाव्याचे आयोजन झाले नव्हते, त्यांनतर आताच या गुडीपाडव्यापासून कोरोनाचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत, यामुळे कार्यक्रमासाठी खुले केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिलीच सभा होणार आहे. यामुळे राज ठाकरे यांचे परखड विचार ऐकण्यासाठी सोलापुर जिल्ह्यातील क कार्यकर्ते आतूर झाले आहेत. त्यामुळे उत्साहाने कार्यकर्ते या मनसे च्या पाडवा मेळाव्यासाठी तयार झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मनसेचे संघटक दिलीप धोत्रे यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मनसेची बहुतावशी जबाबदारी आता जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, आणि विनायक महेंद्रकर यांच्यावर येऊन ठेपली आहे.
 वरील दोन्ही जिल्हाध्यक्ष यांनी दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या कार्यक्षेत्रात असलेल्या  जिल्हा उपाअध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष,  यांच्याशी बैठका घेऊन या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते मेळाव्यासाठी घेऊन जाण्याचे योग्य नियोजन केले आहे.
  या मेळाव्यासाठी वरील पदाधिकारी यांनी  सर्व कार्यकर्त्यांची व्यवस्था केली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या सर्व पदाधिकारी, महिला, आघाडी, विद्यार्थी, वाहतूक, कामगार, शेतकरी, सहकार, यासह  मनसेच्या सर्व सेलच्या कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे असे अवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी केले आहे.