*जयंती स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांची....... चर्चा मात्र जिल्हा परिषद....पंचायत समितीच्या निवडणुकीची.......!*

*जयंती स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांची....... चर्चा मात्र जिल्हा परिषद....पंचायत समितीच्या निवडणुकीची.......!*

*करकंब /प्रतिनिधी*

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे कैवारी ज्यांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती ठीक- ठिकाणी मोठ्या उत्साहाने व आनंदी वातावरणात संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र या शिवजयंती महोत्सवांमध्ये कधीच नव्हे स्वराज्याची आठवण झाल्याने प्रत्येक जण सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य काळात निर्माण केलेल्या थोरल्या वेशीत शिवरायांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आली. या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आणि या स्वराज्यातल्या रयतेची बहुतेक जाण निर्माण झाली असावी , अशी आशा किंबहुना कुणकुण लागल्यामुळे त्यातच आगामी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने रयते शी आपण किती प्रामाणिक आहोत आणि या प्रामाणिकपणा मुळेच आपणच या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचू शकतो. त्यांच्या अडीअडचणीला मदतीला धावून जाऊ शकतो. अशा जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या ही चर्चा जमलेल्या एकमेकांमध्ये सुरू होती. तर काहीजण या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा परिषद व पंचायत समितीची गुप्त खलबते कशी आणि कुठे आणि कशा पद्धतीने करायची हेही या शिवजयंतीच्या अगदी शिवरायांच्या समोर शिवरायांच्या साक्षीने ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आल्यामुळे येणारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये कोणते मासे गळाला लागणार.... हेही याच निमित्ताने निश्चित झाल्याचे समजते.*