*लोकांच्या आगृहास्तव माढा पंढरपूर विधानसभा निवडणूक लढविणार* *करकंब येथे विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साधला संवाद.

.करकंब /प्रतिनिधी
ज्याप्रमाणे अनेक वर्ष बंद असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना शेतकरी उत्पादक सभासद, कर्मचारी आणि सामान्य जनतेने जो विश्वास दाखवून सभासदांची सेवा करण्याची संधी दिली. असेच सहकार्य आणि विश्वास या माढा -पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिल्यास निश्चितपणाने ही माढा -पंढरपूर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट मत अभिजीत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
करकंब येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आणि युवकांमध्ये प्रचंड प्रेस निर्माण असलेले-अभिजीत आबा पाटील हे प्रशासकीय कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांच्याशी संपर्क साधल्यावर माढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका व्यक्त केली.
करकंब येथे युवावर्ग व्यापारी शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य लोकांशी अभिजीत आबा पाटील यांनी प्रत्यक्ष संवाद साधून शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाविषयी, तसेच इतर अडीअडचणी जाणून घेऊन याचा निश्चित पाठपुरावा केला जाईल.त्या कशा सोडवल्या जातील. शेतकरी व्यापारी युवा वर्ग आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी बाबत निश्चित प्रयत्न केला जाईल करकंब येथे ज्येष्ठ, युवक, व्यापारी सर्वांशी संपर्क साधत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रमेश खारे (सर), मा. उपसरपंच दिलीप नाना पुरवत, आदिनाथ दादा देवकते, रमेश खारे (सर), प्राध्यापक -सतीश देशमुख, नितीन खटके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष- शहाजी मुळे, सरपंच- प्रेम चव्हाण, उद्योजक-अमोल शेळके, ज्योतीराम मदने, अभिजीत पाटील, धनाजी व्यवहारे , तानाजी जाधव, आदि सह शेतकरी व्यापारी ग्रामस्थ युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करकंबकर ही अभिजीत आबा पाटील यांना प्रतिसाद देत असल्याचे यावेळी चित्र दिसून आले. त्यामुळे आगामी माढा- पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन-अभिजीत आबा पाटील यांनी जो प्रतिसाद दिला आहे. त्यास करकंब सह 42 गावे आणि माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अभिजीत आबा पाटील यांच्या क्रेजमुळे व विश्वासामुळे सर्वार्थाने बळ मिळणार असल्याचे सध्यातरी राजकीय तज्ञातून बोलले जात आहे.