.*विरोधकांचा घंटागाडी साठी चार दिवसाचा अल्टिमेट... चार दिवसात घंटागाडी गावात आल्यास ग्राम विकास अधिकारी यांचा सत्कार होणार....*..?* *एकलव्य भूमिपूजनप्रसंगी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय धनुर्विद्या चा सामना.... संयोजक झाले अवाक्.....!*

करकंब /प्रतिनिधी:-
करकंब येथे एकलव्य अभ्यासिका भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करकंब येथील असलेल्या मोडनिंब रोड लगत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या फार्म हाऊस वर करण्यात आले होते. या एकलव्य अभ्यासिका सोहळ्यासाठी करकंब येथील सत्ताधारी पार्टी बरोबरच विरोधी पक्षाचे तसेच शिक्षक, उद्योजक आणि पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रम होता एकलव्य अभ्यासिका भूमिपूजन सोहळ्याचा.... मात्र या एकलव्य अभ्यासिका च्या व्यासपीठावर मात्र राजकीय टोलेबाजी मुळे खऱ्या अर्थाने एकलव्याची असलेली अप्रत्यक्ष धनुर्विद्या करकंब मध्ये राजकीय टोलेबाजी तून प्रत्यक्षपणे ऐकावयास व पाहावयास मिळाली. या धनुर्विद्येत आपण किती तरबेज आहोत. असा या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न तर हा नव्हता ना.. या एकलव्य अभ्यासिका व्यासपीठावर राजकीय कलगीतुऱ्याची सुरुवात सत्ताधाऱ्यांनी केली... त्यामुळे सहाजिकच विरोधी पक्षही मागे राहिले नाहीत . विरोधकांनी जशास तसे उत्तर देऊन टाकले.
या एकलव्य अभ्यासिका भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल काका पुरवत यांनी चार दिवसात ग्राम विकास अधिकारी यांनी घंटागाडी करकंब मध्ये आणल्यास त्यांचा विशेष सत्कार करू असे सांगितले. कारण सत्ताधारी घंटागाडी सुरू करणार नाहीत हे माहीत असल्यामुळे कदाचित विरोधकांनी सत्कार करणार असल्याचे सांगून अल्टिमेट दिली असल्याची चर्चा होत आहे. त्यातच या एकलव्य अभ्यासिका भुमी पूजनाचे अध्यक्षस्थान माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांनीही जागर स्वच्छता टीमचे कौतुक करीत गावात असलेल्या घाणीच्या साम्राज्यात बाबत व स्वच्छते बाबत आणि कचऱ्याबाबत अप्रत्यक्षपणे शाब्दिक बाण सोडले.