*भाजपा यांच्या वतीने करकंब येथे ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन.* *मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिर* *गुरुवार दिनांक-12 मे रोजी आयोजन*

करकंब/ प्रतिनिधी
- कामगार दिनानिमित्त करकंब येथे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्या वतीने मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे असे भाजपा कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस मनोज पवार यांनी सांगितले. या ई - श्रम कार्ड नोंदणीच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ तसेच या योजनेमध्ये नोंदणी केल्याने सरकारला पुढील येणाऱ्या योजनांमध्ये नोंदणी धारकांना सरळ लाभ देण्यास मदत होईल व प्रवासी कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यास मदत होईल तसेच कामगारांना एक वर्षासाठी पी एम एस बी वाय अंतर्गत दुर्घटनाग्रस्त मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास रुपये दोन अथवा एक लाख पर्यंत लाभ घेता येईल.
तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये सहायता निधी डिबीटी च्या माध्यमातून श्रमिकांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करता येईल याशिवाय अनेक सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक योजनांचा लाभ या माध्यमातून कामगारांना मिळणार आहेत तरी करकंब व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त कामगारांनी कार्ड नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हे श्रमिक लेबर कार्ड लहान व सीमांत शेतकरी शेतमजूर सुतार कुंभार न्हावी पशुपालन करणारे अशा कामगार अंगणवाडी सेविका रस्त्यावरचे विक्रते बांधकाम कामगार दूध उत्पादक शेतकरी कामगार भाजी आणि फळ विक्रेते ऑटोचालक गवंडी लोहार सुरक्षा कमी प्लंबर इलेक्ट्रिशियन व सर्व इतर कामगार ई- श्रमिक लेबर कार्ड काढू शकतात .असे भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस मनोज पवार यांनी सांगितले.