*सरकोलीत यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा ...* *स्थानिक महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आम आदमीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांची तहसीलकडे तक्रार....*

पंढरपूर (प्रतिनिधी)
सबंध सोलापूर जिल्ह्यातील वाळू साठ्यांचे लिलाव झाले नसताना, पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे यंत्राच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. याचा नाहक त्रास संबंध गावकऱ्यांना होत आहे .सहाजिकच येथील तलाठी, कोतवाल आणि पोलिस पाटील यांना ही बाब माहीत आहे. येथील बेकायदेशीर वाळू उपसा होण्यास कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कामात कसूर केल्याची जबाबदारी निश्चित करावी, आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे. वाळू बंद आहे असे ठणकावून सांगणाऱ्या महसूल प्रशासनास आम आदमी पार्टीकडून घातले गेलेले हे अंजनच आहे.
पंढरपूर तालुक्यात भीमा नदी पात्रातून वाळू उपशाला बंदी आहे. परंतु सरकोली येथील भीमा नदीच्या पत्रातून बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची तक्रार, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माणिक भोसले यांनी केली आहे. सरकोली येथे वाळू उपसा सुरू आहे ,आणि तोही यंत्राच्या साह्याने ही गोष्ट महसूल विभागाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. यासंदर्भातील निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी तहसीलदारांना दिली आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष नागेश पवार हेही उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील खडी क्रेशर नुकतेच सील करण्याची कारवाई करण्याची पाळी पंढरपूरच्या तहसीलदारांवर आली आहे .या ठिकाणी चालणारे सर्वच क्रेशर अवैध पद्धतीने चालत असल्याची चर्चा तालुकाभर पसरली आहे. महसूल विभाग तालुक्यात बेकायदा वाळूचा उपसा होत नसल्याचे ठणकावून सांगत आहे. अशी परिस्थिती असताना सरकोली येथे यंत्राच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची तक्रार ,आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे येथील तलाठी कोतवाल पोलीस पाटील यांना ही गोष्ट ठाऊक असून ,त्यांच्याच सहकार्याने बेकायदा वाळू उपसा होत असल्याची तक्रार आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित महसुली अधिकाऱ्यांवर कामात कसूर केल्याची कारवाई निश्चित करण्यात यावी, आणि संबंधित वाळू तस्करांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे.
चौकट
पंढरपूर तालुक्यातील महसूल विभाग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. पंधरा दिवसापूर्वी तालुक्यातील सर्वच खडी क्रेशर सील करण्याची पाळी येथील तहसीलदारांवर आली, आणि येथील बहुतांश क्रेशर बेकायदा चालत असल्याची माहिती तालुक्यासमोर आली आहे. पंढरपूर तालुक्यात कोठेही बेकायदा वाळू उपसा होत नसल्याचे ठणकावून सांगणाऱ्या महसूल विभागाची ,आम आदमी पार्टीच्या तक्रारीने झोपच उडवली आहे. याठिकाणी यंत्राच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे येथील तलाठी ,कोतवाल आणि पोलीस पाटील यांचेही या वाळू तस्करीस सहकार्य असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे .या प्रकरणाने पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचे कान चांगलेच टवकारले आहेत.