*शेती व शेती उद्योगाचे ज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत करणे आजच्या काळाची गरज-आदित्य गुळमे.*  *कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत बायोटेक पार्कला अभीछाया प्रतिष्ठान संचलित अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची भेट.*

*शेती व शेती उद्योगाचे ज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत करणे आजच्या काळाची गरज-आदित्य गुळमे.*  *कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत बायोटेक पार्कला अभीछाया प्रतिष्ठान संचलित अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची भेट.*

: करकंब /प्रतिनिधी:

सध्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होत असलेल्या जमिनीचा रास टाळण्यासाठी आपण आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रयोग करून सेंद्रिय खताच्या वापरामुळे होणाऱे फायदे व पिकांचा उत्पादन खर्च कमी करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. यासाठी या कृषी विज्ञान व तंत्रज्ञान अंतर्गत असलेल्या बायोटेक पार्क च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आजच्या काळामध्ये शेती व शेती उद्योगाचे ज्ञान अवगत करण्याचे मत बायोटेक पार्क करकंब या रोपवाटिकेचे प्रवर्तक आदित्य गुळमे यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य विकास शेळके कृषी तंत्रज्ञान व विज्ञान विषयात शिक्षक प्रमोद रेडे पाटील , प्राध्यापक तुषार शिंदे प्राध्यापक सुरज कावडे लक्ष्मी माने मॅडम प्रतिक्षा शिंदे मॅडमआणि अनिता मोरे मॅडमआदी सह शिक्षक उपस्थित होते.

: पुढे बोलताना प्रवर्तक आदित्य गुळमे म्हणाले या रोपवाटिकेतील सर्व लागवड केलेल्या रोपांची सविस्तर माहिती सांगून ऊस कलिंगड वांगे टोमॅटो मिरची केळी यांची लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. करकंब येथील अभिछाया प्रतिष्ठान संचलित अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करकंब यांनी नुकतीच या करकंब बायोटेक पार्क ला भेट देऊन याबाबतची माहिती घेतली.