*कासाळगंगा ओढ्याची स्थानिक प्रशासनाकडून पाहणी* *मंडल अधिकारी, तलाठी पोलिस पाटील यांची संयुक्तिक भेट*

*कासाळगंगा ओढ्याची स्थानिक प्रशासनाकडून पाहणी*  *मंडल अधिकारी, तलाठी पोलिस पाटील यांची संयुक्तिक भेट*

पंढरपूर/प्रतिनिधी 

काल रात्री कासाळगंगा ओढ्यावरील पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या पाण्याची मोठी आवक वाढली होती. यामुळे शेळवे  पूल पाण्याखाली गेला आहे. या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे या भागातील स्थानिक प्रशासनाकडून या भागाची पाहणी केली आहे.
     या ओढ्याला कटफळ, महूद, महिम, भाळवणी, धोंडेवाडी, जैनवाडी, ऊपरी, गार्डी, भांडीशेगाव, या भागात भरपूर पाऊस झाल्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी आले आहे.त्यामुळे कासाळगंगा ओढा पाण्याने भरून वाहत आहे .तो ओढा शेळवे येथील भीमा नदीपात्रामध्ये येऊन समाविष्ट होतो. या ओढ्यावरील पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे येथील पूल सध्या पाण्याखाली आहे .या पुलावरून साधारण ते 20 ते 25 फूट पाण्याचा प्रवाह वाहत आहे. या परिसराची पाहणी  भांडीशेगाव बीटचे मंडल अधिकारी दिनेश भडंगे, तसेच तलाठी प्रभाकर उन्हाळे व पोलीस पाटील नवनाथ पाटील यांनी पाहणी केली करून शासनाला सर्व अहवाल कळविला आहे.