*राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे यांचीही  शेतकऱ्यांच्या बांधावर भेट*

*राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे यांचीही  शेतकऱ्यांच्या बांधावर भेट*

पंढरपूर :/ प्रतिनिधी
 
सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, खर्डी, कोर्टी, टाकळी,तनाळी, तपकिरी शेटफळ, तावशी, उंबरगाव, बोहाळी या गावांमध्ये शेतीमध्ये पाणी शिरून शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी पाहणी केली.
याप्रसंगी सिद्धनाथ सिताराम काळे, मधुकर सिताराम काळे यांच्या गादेगाव येथील डाळींब बागेची पाहणी केली.
या अनपेक्षित संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, बळीराजा हवालदिल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नागेश फाटे यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन करत, प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून मदतीची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माध्यमांशी बोलताना नागेश फाटे यांनी स्पष्ट केले की, शरद पवार, जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या या संकटावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तातडीने आणि प्रभावी निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या भागातील शेतकरी सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात असून, शासनाने त्वरित हस्तक्षेप करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांनी केली आहे.