*करकंब प्रहार दिव्यांग संघटनेच्या करकंब शहराध्यक्षपदी उमेश गोडसे तर शाखाध्यक्ष पदी महेंद्र लोंढे यांची निवड*  *संस्थापक नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी संपन्न*.  *अपंगाचे राजकीय सामाजिक पुनर्वसन करून विविध योजनांची अंमलबजावणी करणार -जिल्हा सचिव संजय जगताप*.

करकंब/ प्रतिनिधी

: प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक नामदार बच्चुभाऊ कडू राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी पंचायत समिती भवन पंढरपूर येथे विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.

   : या निवडी प्रसंगी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना जिल्हा सचिव संजय जगताप म्हणाले संघटनेची ध्येय धोरणे अपंगासाठी (दिव्यांग)असणाऱ्या योजना, अपंगाचे राजकीय सामाजिक पुनर्वसन आदी विविध प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून त्याबाबतची अंमलबजावणी करणार असल्याचे यावेळी सांगितले.

    : सुरूवातीस करकंब येथील उमेश बाबू  गोडसे यांची करकंब शहराध्यक्षपदी तर शाखा अध्यक्षपदी महेंद्र साधू लोंढे यांची सर्वानुमते निवड करून प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हा सचिव संजय जगताप, पंढरपूर शहराध्यक्ष गणेश ननवरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय चौगुले, पंढरपूर तालुका मार्गदर्शक ज्ञानेश्वर गायकवाड, पंढरपूर शहर महिला अध्यक्ष सुनिता लवंड
यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी करकंब शाखा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, सचिव बाळू पेटकर व लाला शिंदे शरद शिंदे अमर प्रक्षाळे दत्ता धायगुडे आदीसह बहुसंख्य दिव्यांग उपस्थित होते.