* युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन*

* युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन*

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेेते  प्रणव परिचारक यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सामाजिक कृतज्ञापर भव्य अशा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रक्तदान शिबीराचे आयोजक पांडुरंग परिवार पंढरपूर मंगळवेढा युवक आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

प्रणव परिचारक हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरा प्रमाणेच आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात त्याच प्रमाणे या वर्षीही त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मार्केट यार्ड येथे मंगळवार २८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंतपर्यंत सुरू राहणार असून या रक्तदान शिबीरात अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उक्तीस अनूसरून  सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासावी