*जुन्या आष्टी- रोपळे रोडच्या मुरमीकरनाचा शुभारंभ*

*जुन्या आष्टी- रोपळे रोडच्या मुरमीकरनाचा शुभारंभ*

रोपळे /प्रतिनििधी 

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील जुन्या आष्टी -रोपळे रोडच्या मुरमीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला असून यामुळे सुमारे तीस वर्षापासून शेतकऱ्यांची असणारी रस्त्याची समस्या दूर होणार आहे.
 वाशिम जिल्हा भूमापन कार्यालयाचे अधीक्षक शिवाजी भोसले व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी प्रयत्नशील राहून रोडच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून तेथील आडी अडचणी सोडविल्या. संवादानंतर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी रोडचे मुरमीकरनास तयारी  दर्शविल्याने या रोडच्या  मुरमीकरण  कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.


 यावेळी भूमापन अधीक्षक शिवाजी भोसले यांनी सर्व शेतकरी, प्रयत्न करणारे पदाधिकारी यांचे अभिनंदन करून सर्वांनी गावच्या विकासासाठी असेच प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले. 
 यावेळी या कार्यक्रमासाठी रयतच्या जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल कदम, बालाजी भोसले, धर्मराज कदम, तुकाराम भोसले, प्रदीप भोसले, महादेव रोकडे, महादेव भोसले, पप्पू कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.