*भोसे येथील पाटील घराण्याच्या तिसऱ्या पिढीला जिल्हा परिषदेत संधी*.  *गणेश पाटील यांची ग्रामीण भागात आजही क्रेझ कायम.....!*

*भोसे  येथील पाटील घराण्याच्या तिसऱ्या पिढीला जिल्हा परिषदेत संधी*.   *गणेश पाटील यांची ग्रामीण भागात आजही क्रेझ कायम.....!*

करकंब/ प्रतिनिधी

: सन २००२ नंतर तब्बल २० वर्षांनी भोसे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुष गटासाठी राखीव झाल्याने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा सरपंच गणेश पाटील यांच्या रूपाने तिसरी पिढी जिल्हा परिषदेत जाणार असल्याने या भागातील तरुणांचा उत्साह वाढला आहे. 
जिल्हा परिषद गटाच्या निर्मितीपासून या गटावर कै. यशवंतभाऊ व कै. राजूबापू पाटील यांची एकहाती सत्ता होती. आणि आजही ती कायम आहे.  कै. यशवंतभाऊ पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना जनमानसातील त्यांची स्वच्छ प्रतिमा त्यानंतर कै. राजूबापू पाटील यांनी कृषी व पशु संवर्धन समिती सभापतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजना यामुळे या भागातील जनतेने त्यांना कायम स्वीकारले आहे.  कै. राजूबापू पाटील यांच्यानंतर  त्यांच्या पत्नी प्रफुल्लता पाटील या सदस्य झाल्या. त्यानंतर विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब माळी व अतुल खरात यांना या गटातून संधी मिळाली ती केवळ पाटील घराण्याच्या वर्चस्वामुळेच आणि आज तीच संधी अॅड. गणेश पाटील यांच्या रूपाने पाटील घराण्याच्या तिसऱ्या पिढीला मिळत आहे.     
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्व. राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव   अॅड. गणेश पाटील यांच्यावर जिल्ह्यातील युवकांचे संघटन करण्याची जबाबदारी सोपवली. यामध्ये त्यांनी हिरीरीने भाग घेवून मोठ्या प्रमाणात आपल्या कामाचा ठसा उमटवला. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या. त्यानंतर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत संपूर्ण तालुक्यात अण्णाभाऊ पाटील गट कार्यरत केला. यामुळे तालुक्यात त्यांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे जरी गटाची पुनर्रचना झाली असली तरी त्यांना कोणतीही अडचण नसल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.  
  
चौकट :
भोसे जिल्हा परिषद गटातील गावे : भोसे, सुगाव-भोसे, पेहे, शेवते, नेमतवाडी, उंबरे, करोळे, कान्हापुरी, जळोली व सांगावी.
भोसे जिल्हा परिषद गटामध्ये भोसे व उंबरे हे दोन पंचायत समिती गण आहेत त्यामध्ये 
भोसे पंचायत समिती गणातील गावे : भोसे, सुगाव-भोसे, पेहे, शेवते आणि नेमतवाडी  
उंबरे पंचायत समिती गणातील गावे : उंबरे, करोळे, कान्हापुरी, जळोली.