*रक्तदान शिबीराचे रेकॉर्ड ब्रेक* *विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त 2298 रक्तदात्यांचे रक्तदान*

*रक्तदान शिबीराचे रेकॉर्ड ब्रेक* *विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त 2298 रक्तदात्यांचे रक्तदान*


पंढरपूर/, प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील विविध गावातून  आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 2298 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामुळे पंढरपूर तालुक्यात नविन उपक्रमाबरोबरच रक्तदान शिबिराचे रेकॉर्डब्रेक झाले आहे.
युवा नेते चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबीर तसेच वृद्धाश्रम खाऊ वाटप, चादर वाटप, वह्या, पेन, पुस्तक, शालेय वस्तू वाटपाचे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्यात आला होता. एक ऑगस्ट रोजी सायंकाळी पंढरपूरकर यांनी मोठ्या प्रमाणात वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालया समोर गर्दी झाली होती. यावेळी विशाल गायकाड मित्रमंडळ ओझेवाडी यांच्यावतीने क्रेनच्या सहाय्याने हार घालून सत्कार केला. यावेळी पंढरपूर शहरातील नागरिकांनीही   भरभरून शुभेच्छा वर्षाव केलेला दिसून आलेले आहे. कारखाना कार्यस्थळावर असलेल्या मंदिरात भजन किर्तन सोहळाही पार पडला.
या वाढदिवसनिमित्ताने  तुंगत, सुस्ते, आंबे, शिरगाव, तरटगाव, वाडीकुरोली, भाळवणी, कौठाळी, आढीव, गुरसाळे, समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर, जळोली, चिंचोली भोसे, सरकोली, तिसंगी, तावशी, बोहाळी, सोनके, खर्डी, अनवली, खेडभाळवणी, चळे, मुंढेवाडी, रांझणी, विसावा, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, भंडीशेगाव, देगाव, धोंडेवाडी, शेळवे, पिराची कुरोली, शेगाव दुमाला, पळशी, सुपली, उपरी, वाखरी, येवती, उंबरे, कान्हापुरी, बाभुळगाव, नांदोरे, गादेगाव, पुळुज, अशा अनेक गावामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले.
 पंढरपूर तालुक्यात विविध ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त उपक्रम घेण्यात आले त्या उपक्रमांमध्ये माझ्या सर्व सहकार्यांनी लाखमोलाचे योगदान दिले. त्या योगदानाबद्दल मी प्रथमता सर्वांचे ऋणही चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.