*ओझेवाडी पंढरपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक*! *उपसभापती राजश्री भोसले यांनी दिला रास्ता रोकोचा इशारा*

*ओझेवाडी पंढरपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक*!  *उपसभापती राजश्री भोसले यांनी दिला रास्ता रोकोचा इशारा*

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर - ओझेवाडी रस्त्याची दुरावस्था झाली आहे .या रस्त्याच्या कामासाठी मंजुरी असूनही काम सुरु होत नाही. या रस्त्याचे काम आठ दिवसात सुरू करावे ,अन्यथा ओझेंवाडी ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापती राजश्री पंडित भोसले यांनी दिला आहे. उपसभापतींनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे , बांधकाम विभाग प्रशासनात खळबळ उडाली आहे.


पंढरपूर पासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या, ओझेवाडी येथील ग्रामस्थांना सध्या नादुरुस्त रस्त्याचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही हा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. याबाबत २ ऑगस्ट रोजी येथील ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले . दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेला हा रस्ता पूर्ण होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. ओझेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांच्या वतीने हे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले . याचवेळी पंचायत समितीच्या उपसभापती राजश्री पंडित भोसले यांच्या वतीने बांधकाम विभागास दुसरे निवेदन देण्यात आले . येत्या आठ दिवसात पंढरपूर ओझेवाडी रस्त्याचे काम सुरू न झाल्यास, ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. उपसभापती राजश्री भोसले यांनी दिलेल्या या इशाऱ्याने सार्वजनिक विभागाच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.