गादेगावच्या कोविड सेंटरला युवा नेते प्रणव परिचारक यांची भेट! त्यांनी केली आर्थिक मदत, तर उपचार होऊन बरे झालेले रुगणांनाही त्यांच्या उपस्थितीत दिला डिस्चार्ज

पंढरपूर: प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील युवा नेते प्रणव परिचारक यांनी आज गादेगाव येथील उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आवर्जून भेट दिली.
या भेटीदरम्यान परिचारक यांनी या भागातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. तसेंच रुग्णाच्या सेवेसाठी आपली आर्थिक मदतही दिली.
याठिकाणी असलेली सर्व सुविधा पाहून परिचारक यांनी समाधान व्यक्त केले. अशाप्रकारची कोविड सेंटर ग्रामीण भागात उभा राहत असल्यामुळे रुग्णांना याचा फायदा होत आहे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी सेंटरच्या समितीचे आभार मानले यावेळी गावचे सरपंच कुमारी ज्योती बाबर सुहास बागल गणेश बागल अनिल बागल संदीप कळसु ले महादेव फाटे गणपत मोरे बाळासाहेब बागल व ग्रामस्थ उपस्थित होते