*पंढरपुरात भुकेलेला अन्न देऊन मोहम्मद पैगंबर जयंती साजरी*

पंढरपूर,/प्रतिनिधी
अखंड जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त पंढरपूरातील मुस्लिम युवकांनी अनोख्या पद्धतीने जयंती साजरी केली.आज मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त समाजसेवक मुजम्मील कमलीवाले व डाॅक्टर करीम साहेब यांच्या वतीने बेघर,गरजु व गरीब लोकांना मोफत जेवन मंदीर समीती चे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर जळगावकर महाराज व प्रशांत खलीपे यांच्या हस्ते वाटप करन्यात आले.
आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण सत्कर्म करायला पाहिजे गोरगरिबांना मदत तसेच दानधर्म करायला पाहिजे ही भावना प्रत्येक माणसाने आपल्या मनामध्ये जागृत ठेवली पाहिजे.अशाप्रकारे समाजकार्य पंढरपूर शहरातील मुस्लिम युवक मुजम्मील कमलीवाले यांनी सुरू ठेवलेले आहे कोरोना सारख्या महामारी मध्ये पंढरपूर शहरात त्यांनी स्वच्छता व वैद्यकीय सेवा पुरवून तसेच गोरगरीब यांना अन्नदान करून आपली समाजसेवा जनतेच्या हितासाठी व त्यांच्या रक्षणासाठी केलेली आहे.
"अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे समाजसेवक मुजमील कमलीवाले यांच्या समाजकार्याची दखल राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घ्यावी तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार मिळाला असे ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी बोलताना सांगीतले...
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर यावेळी मनोज कलागते, डॉक्टर चव्हाण, डॉक्टर मौलाली मोगल तुकलक शेख उपस्थित होते.