*संत निरंकारी मंडळाच्यावतीने बावी येथे रक्तदान शिबिर संपन्न*

करकम्ब:-प्रतिनिधी
संत निरंकारी मंडळाच्या वतीने बावी तालुका माढा येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले, या शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिराच्या उद्घाटन माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजी साठे यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संत निरंकारी मंडळाच्या करमाळा तालुक्याचे प्रमुख पोपट थोरात तर
अध्यक्ष म्हणून चांद महाराज तांबोळी हे होते याप्रसंगी बोलताना माननीय धनाजी साठे म्हणाले की संत निरंकारी मंडळ हे समाजामध्ये ब्रह्मज्ञानाचा प्रचार करण्याबरोबर वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन रक्तदान शिबिरे गरीब आणि गरजूंना संकट काळी मदत करत असताना पहायला मिळते अध्यात्म बरोबर सामाजिक उपक्रमाची जोड देऊन संत निरंकारी मंडळ फार मोठा सामाजिक काम करत आहे याप्रसंगी भारत नाना पाटील संचालक कुर्मदास सहकारी साखर कारखाना सयाजी नाना पाटील माजी सरपंच दशरथ तात्या मोरे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष श्रीशैल मोरे गणेश मोरे श्रीकांत दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार मोरे राजू वाघमारे अनिल पवार उमेश सुतार कल्याण मोरे तसेच गावातील व तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी मंडळाचे माडा ब्रांच मुक्ती समाधान राऊत व बावी गावचे ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस दत्तात्रय महाराज मोरे यांनी केले होते ोरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत उद्घाटन समारंभ तसेच रक्तदान शिबिर संपन्न झाले याप्रसंगी दारफळ येथील सुधाकर राक्षे यांचा 55 वेळा रक्तदान केल्या प्रित्यर्थ विशेष सन्मान धनाजी साठे यांच्या हस्ते संपन्न झाला