*माणूस किती दिवस जगला हे महत्त्वाचे नसून कसा जगला हे महत्त्वाचे आहे:-नम्रता व्यास-निमकर.* *करकंब श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा नारदीय कीर्तन महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

*माणूस किती दिवस जगला हे महत्त्वाचे नसून कसा जगला हे महत्त्वाचे आहे:-नम्रता व्यास-निमकर.*   *करकंब श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा नारदीय कीर्तन महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद


करकंब:/प्रतिनिधी 

  येथील श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या पौष पौर्णिमा नारदीय कीर्तन महोत्सवात पाचव पुष्प नम्रता व्यास-निमकर यांनी गुंफताना सांगितले.*
*सुरुवातीला आज चौंडेश्वरी मातेची पूजा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेची पूजा नम्रता व्यास,विद्या वास्ते, वृषाली बोधे,आदी महिलांच्या शुभहस्ते करुन कीर्तनाला प्रारंभ झाला,मनुजा जन्मुनी केले काय या शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगावर निरुपण करताना सांगितले की मनुष्याने जन्माला येऊन काय केलं पाहिजे,श्रवण भक्ती ही अतिशय श्रेष्ठ भक्ती असून सर्वांनी भगवंताच नाम मनापासून घेऊन भगवंतावर निश्चित प्रेम केलं पाहिजे,माणूस आयुष्यात येऊन किती दिवस जगला हे महत्त्वाचे नसून तो कसा जगला हे महत्त्वाचे असून भगवंताची दुःखात आठवण होते परंतू सुखामध्ये आपण भगवंताला विसरून जातो असे चालणार नाही,शरीरातील षडरिपू नाहीसे करायचे असतील तर नामस्मरण हाच एक उत्तम पर्याय असून काळ टपून बसलेला आहे कधी जाईल हा देह सांगता येत नाही यावर अनेक दृष्टांत देऊन उत्तररंगामध्ये एकनाथ महाराज यांचे शिष्य गावबा यांचं अतिशय सुंदर चरीत्र सांगताना संतांच्या वचनावर विश्वास ठेऊन जो वागेल त्याच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही,तसंच आपल्या आयुष्याचं कल्याण संत एकनाथ महाराज यांच्या सहवासात राहून केलं,तसंच आपलंही कल्याण संतचरित्र एकूण करावीत असे सांगितले त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत हार्मोनियम चिंतामणी निमकर, तबला ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे यांनी सुंदर केली,तसेच गुरुवार रोजी बनाळळी येथून युवकांच्या माध्यमातून ज्योत आणण्यासाठी सर्वांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन केले आहे, महोत्सव यशस्वी करण्यासाठी समस्त कोष्टी समाज अधिक परिश्रम घेत आहेत.*

*फोटो सौजन्य साई डिजिटल रुपेश सदावर्ते करकंब*