*सायबर क्राईम पासून सावध राहावे - सपोनि निलेश तारू*

करकंब/ प्रतिनिधी :-
सायबर क्राईम पासून सर्वांनी सावध राहावे सायबर क्राईम मध्ये वाढ होत असून निष्काळजीपणा केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी केले .
रायझिंग डे च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते रामभाऊ जोशी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना बोलत होते यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक धनवंत करळे पोलीस कर्मचारी रमेश फुगे , पोना लेंगरे आदी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करीत असताना श्री तारू यांनी सायबर क्राईम कशाप्रकारे घडतो याबाबत काय काळजी घ्यावी यासाठी कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली आर्थिक फसवणुकीसोबत सेक्स एसॉर्ट चे गुन्हे वाढले असून हे गुन्हे कसे घडतात व त्या साठी काय सावधानता बाळगावी, फेसबुक, इंस्टाग्राम याचा वापर करीत असताना कोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले, याबरोबरच स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास करावा याचेही मार्गदर्शन यावेळी तारु यांनी केले .
करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली.