*पोलीस असल्याचे बतावणी करणाऱ्या तोतया पोलिसा विरोधात गुन्हा दाखल.*

*पोलीस असल्याचे बतावणी करणाऱ्या तोतया पोलिसा विरोधात गुन्हा दाखल.*

करकंब/ प्रतिनिधी:-
         दि. 14 एप्रिल 2023 रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास अक्षता मंगल कार्यालया समोर भोसे पाटी ते करकंब रोडवर 
भोसे ता पंढरपुर येथे एचएफ डीलक्स मोटरसायकल नंबर एमएच-13- सी.किव. 3138 वरील 
समाधान गोरख मढे रा. शिर्डी जिल्हा अहमदनगर हा पोलीस असल्याचे बतावणी करून प्रकाश बंडू बनकर वय 27 वर्षे धंदा- शेती रा.करकंब तालुका पंढरपूर  यांची मोटरसायकल अडवून व इतर मोटरसायकल अडवलेल्या लोकांना लायसन व गाडीचे कागदपत्र मागित होता व त्यांना दम देऊन तुम्ही पैसे काढा तुम्हाला दंड भरावा लागेल असे असे सांगून पैसे गोळा करीत होता.
  आरोपी समाधान मढे याची मोटरसायकल एचएफ डीलक्स एम एच-13-सी कीव 3138 यावर पुढचे बोनेटवर महाराष्ट्र पोलीस लिहिलेले व महाराष्ट्र पोलिसांचा लोगो होता व मागचे बाजूस इंग्रजी अक्षर मध्ये पोलीस असे लिहिलेले होते.मढे याने प्रकाश बनकर यांची गाडी अडवून दम देत ए तुझ्या गाडीला नंबर नाही असे म्हणून जबरदस्तीने बनकर यांच्या शर्टचे व पॅन्टचे खिसे जबरदस्तीने तपासून चोरीचा प्रयत्न करीत होता.         

    त्यानंतर बनकर यांनी करकंब पोलिस स्टेशनचे ट्रॅफिक हवालदार विजय गोरवे व शिपाई सुर्वे संपर्क साधला. व यांनी त्याचा पाठलाग करून गाडीसह जळोली चौक येथुन ताब्यात घेऊन करकंब पोलीस ठाणे गुरनं. 138/2023 भा.द.वि. कलम 341,170,171,393 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई फुगारे हे करित आहेत.