*शेवते येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन*

*शेवते येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन*


करकंब/ प्रतिनिधी :-

 शेवते, ता - पंढरपूर येथे आज दिनांक 10/04/2022 रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्यामध्ये पुष्पवृष्टी व आरतीच्या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन  रणजित (भैय्या) शिंदे उपस्थित होते.
        या भाविक सोहळ्यासाठी मा.जि.प.सदस्य व्यंकटराव भालके, विठ्ठलराव शिंदे साखर कारखानाचे संचालक श्री.पोपट (मामा) चव्हाण, दूध संघाचे संचालक श्री बाळासाहेब माळी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.दशरथ खळगे, श्री. माणिकराव पाटील, दिलीप खळगे, सरपंच दत्तात्रय तूपस॑वदर,.उपसरपंच बबलू शेवतकर , ग्रामपंचायत सदस्य कुंडलीक खळगे, बाळासाहेब पाटील , मा. सोसायटी चेअरमन नारायण यड्रावकर तसेच शेवते व परिसरातील गावोगावचे लोक, वयोवृद्ध व महिला भाविक भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित होते.