*लोकभूषण स्व. राजूबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उंबरे येथे रक्तदान शिबिर*

*लोकभूषण स्व. राजूबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उंबरे येथे रक्तदान शिबिर*

पंढरपूर:-प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्याचे लोकभूषण कै.राजूबापू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उंबरे (पागे )येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या          शिबिराचे उद्घाटन आणि प्रतिमेचे पूजन जळोलीचे सरपंच जोतीराम मदने, कान्हापुरीचे सरपंच प्रेम चव्हाण, उंबरे गावचे सरपंच प्रतिनिधी महादेव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.      यावेळी  करकंबचे उपसरपंच आदिनाथ देशमुख,जि.प.सदस्य अतुल खरात,स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहाजहान शेख,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी यांनी भेट दिली यावेळी माजी सरपंच ज्ञानदेव कोरके,भारत वावरे,ज्ञानदेव ढोबळे पांडुरंग सहकारी साखर कारखाना संचालक,उपसरपंच नागनाथ कानगुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी तालुका अध्यक्ष अमर इंगळे, परमेश्वर लोंढे,अनिरूद्ध मुजमुले,हरिनाना कानगुडे,विठ्ठल माळी,सुभाष ढोबळे,ब्रम्हदेव कानगुडे,लक्ष्मण हुबाले,आनंदा तोडकरी ,धनाजी मुळे उपस्थित होते. प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू आणि झाड वाटप करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजुबापू पाटील प्रेमी यांनी केले होते