*करकंब येथे महावीर जयंती उत्साहात संपन्न...!* *भव्य शोभायात्रा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.* *महाप्रसादाने सांगता.*
करकंब/ प्रतिनिधी:-
येथील सकल जैन समाज यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहाने व धार्मिक कार्यक्रमानी तसेच करकंब शहरातून भव्य शोभायात्रा काढून साजरी करण्यात आली.
करकंब येथील सकल जैन समाजाच्या शंभर ते सव्वाशे वर्ष असलेल्या भगवान नेमिनाथ व भगवान आदिनाथ या धार्मिक मंदिरातून भगवान महावीरांची शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा सहवाद्यांसह मंदिरापासून ते म्हसोबा चौक (पुरवत गल्ली) ते शुक्रवार पेठ ते धाकटी वेस ते टिळक चौक ते आतार चौक ते सोमवार पेठ मंदिरापर्यंत या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक कार्यक्रमांनी महावीर भगवान जयंती साजरी केली. विशेषता या महावीर भगवान जयंती निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले होते.
या महावीर भगवान धार्मिक सोहळ्यामध्ये दिलीप नाना पूरवत, भारत शहा , राहुल काका पूरवत, राजेश शहा, महावीर मगदूम, इंद्रजीत शहा लालचंद पुरवत , मनोज शहा ,सचिन शहा, श्रेणिक शहा , वरूण पुरवत, अमित शहा, प्रज्योत पूरवत, महावीर भाळवणकर , शितल मगदूम , संदीप पंडित , ऋषभ पुरवत, शार्दुल पूरवत, मयुर पुरवत,स्वप्निल शहा आदीसह बहुसंख्य सकल जैन समाज बांधव व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.