*मकर संक्रांतीच्या सणासाठी महिलांची लगबग.....!!* *करकंब बाजारपेठेत मंदीचे सावट...*

*मकर संक्रांतीच्या सणासाठी महिलांची लगबग.....!!*  *करकंब बाजारपेठेत मंदीचे सावट...*

करकंब/ प्रतिनिधी :-
           भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला महत्त्वपूर्ण मानले जात असून विशेषता यावर्षीच्या प्रथम असलेल्या या महिलांच्या मकर संक्रांतीच्या सणाला सुहासिनी अर्थात महिलावर्ग यांची करकंब बाजारपेठेत सध्या लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
    ‌‌.         या मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून करकंब येथील थोरली वेस् या ठिकाणी या मकर संक्रांतीचे वैशिष्ट असलेल्या आणि सुहासिनीना खणाच्या खरेदीसाठी तसेच या महत्वपूर्ण असलेल्या सणासाठी महिलांची सध्या करकंबच्या बाजारपेठेत खरेदी करताना दिसून येत आहे. असे असले तरी महागाईचा प्रचंड भडका उडाल्याने करकंब बाजारपेठेवर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. तरीही या वर्षातील हा पहिला भारतीय संस्कृतीतील महिलांचा सण असल्याने  महिलावर्ग खण व मकर संक्रांतीच्या सणाला लागणारे साहित्य मोठ्या उत्साहाने खरेदी  करतात.
            येथील  कुंभार वाड्यातील कुंभार मूर्तीकरांनी यावर्षीच्या मकर संक्रांतीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खण बाजारात आणि आणि कुंभार वाड्यात विक्रीसाठी उपलब्ध  केले असून तीस रुपयापासून ते 70 ते 80 रुपया पर्यंत या सुहासिनीच्या मकर संक्रांतीच्या खणासाठी कुंभार बांधवांनी विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.
       विशेषता याच बाजारपेठेत तिळगुळ, हळदी- कुंकू व या मकर संक्रांतीच्या सणासाठी लागणारे विशेष साहित्यही छोटे -मोठे व्यापारी विक्रीसाठी बसले आहेत.
            मकर संक्रांतीच्या सणाला सुहासिनी  या खणांची पूजा करून गावातील मंदिरामध्ये दर्शन घेऊन एकमेकांना भेटून तिळगुळ घ्या आणि गोड - गोड बोला...! या परंपरेने महिलावर्ग भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासण्याचे काम करीत असतात.