*उत्तम प्रशासक म्हणून कामगिरी बजावत असलेल्या प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांच्या बदलीला तात्पुरती स्थगितीच मिळावी* *अन्याय गृहस्थाला न्याय ,वाशीलेबाजीला थारा न देणारे आणि फोनवरील मेसेजवरूनही उत्तरे देऊन अडचणी दूर करणाऱ्या या प्रांताधिकारी ढोले यांना कालावधी वाढवून मिळावा* , *स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक सामाजिक संघटनाची मागणी,*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर आणि मोहोळ या दोन तालुक्यासाठी लोकप्रिय आणि उत्तम प्रशासक म्हणून लावलौकीक मिळविलेले प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा कालावधी संपत आला आहे, यामुळे त्याची आता बदली होणार असे चर्चिले जात आहे. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये अस्वस्थता पसरली जात आहे. त्यामुळे अनेक संघटनांनीही बदलीला तात्पुरता स्थगिती मिळावी,यासाठी वरिष्ठ अधिकारी यांना लेखी विनंती स्वरूपात निवेदन देण्यास सुरुवात केली आहे.
मागील दोन दिवसांपासून अनेक संघटनांनी अगदी मनापासून ही बदली थाम्बविण्यासाठी प्रयत्न केले असतानाच ,स्वाभिमानी शेतकरी संघटनाही यासाठी आता उतरली आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केलेले कार्य हे पंढरपूरकरांच्या दृष्टीने अवस्मरणीय आहे,असा अधिकारी पुन्हा पंढरपूर ला येणे अशक्य आहे.
त्यांच्या कारकिर्दीवर जर नजर टाकली तर जनसामान्यांच्या सहज संपर्कात असणारा लोकप्रिय प्रांताधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.
त्यांच्या कार्यकाळात सुरूवातीला मंदीर समिती,लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक , आषाढी वारी , कार्तिकी वारी नियोजन, विविध पक्षांचे,संघटनेचे सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलने,महापूर, दुष्काळ, अतिवृष्टी,कोरोना नियंत्रण नियोजन, राष्ट्रीय महामार्गाचे रत्याचे काम,भूसंपादित झालेल्या शेतकर्यांचे पैसे वाटपाचे काम त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थळपाहणी करून अनेक प्रकरणे निकाली काढणे, सुमारे २०० गावात प्रत्यक्ष जाऊन संरपच, उपसरपंच,ग्रामंपाचयात ,ग्रामसेवक तलाठी,कोतवाल, पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांना वेळो वेळी आपत्ती काळात मार्गदर्शन , विविध मंत्र्याचे दौरे,कार्यालयीन कामकाज काटेकोरपणे संभाळणे,अशा अनेक कामांत साहेबांनी समाजाची बांधालिकी म्हणून युद्ध पातळीवर काम केले आहे.
अशा माणासाला आम्हांला सोडताना अतिशय वाईट वाटत असून तालुक्यातील जनता अवस्थ आणि संभ्रम अवस्थेत आहे.
सामान्य जनतेशी त्यांनी जोडलेली नाळ ही कधीही न तुटण्यासाखी आहे.पंढरपूर हे तीर्थ क्षेत्र असल्यामुळे मोठा धोका असताना अनुभवी अधिकारी सचिन ढोले यांची बदली झाली तरी फार मोठे नुकसान करणारी आहे यांची गांभिर्याने शासनाने दखल घेऊन त्यांना अजून ६ महिने मुदतवाढ मिळावी.अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेवतीने जिल्हाध्यक्ष तानाजी बागल ,विजय रणदिवे,पपू पाटील, सचिन पाटील, रणजित बागल, शहाजहान शेख, सचिन आटकळे,रायाप्पा हळणवार ,नवनाथ मोहिते, नानासाहेब चव्हाण, सोमनाथ घोगरे, धनंजय बागल,दशरथ जवळेकर करण्यात आली आहे.