*राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजन* *गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात असलेल्या वृध्द माता पित्याना दिले भोजन* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने स्थुत्य उपक्रम*

पंढरपूर/प्रतींनीधी
खा .शरदचंद्रजी पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे वतीने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. या विविध उपक्रमात मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे निराधार वृद्ध व्यक्तींना मिष्ठांन भोजन देऊन वाढदिवस साजरा केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नगेशदादा फाटे यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला साहेबांकडुनच मिळाली आहे.हे वृध्दाश्रम चालविणे संत तनपुरे बाबांचे हे महान कार्य त्यांची पुढील पिढी प्रामाणिक पणे पार पाडत आहे. असे आवर्जून सांगितले.
या वेळी प्रदेश सचिव श्री.कल्याण कुसुमडे,श्री.संजय पवार, संस्थेचे विश्वस्त डॉ.श्री.अनंत तनपुरे, डॉ.श्री.शुभांगी तनपुरे, डॉ.जानकर,श्री.नागेश गेळे आदी मान्यवर उपस्थित होते.