*निर्मलग्राम ग्रामपंचायत वाडीकुरोली च्या सरपंचपदी सुप्रिया काळे यांची बिनविरोध  निवड*

*निर्मलग्राम ग्रामपंचायत वाडीकुरोली च्या सरपंचपदी सुप्रिया काळे यांची बिनविरोध  निवड*

पंढरपूर/प्रतिनिधी

वाडीकुरोली ता. पंढरपूर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सुप्रिया योगेश काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे सरपंच अर्चना काळे यांनी राजीनामा दिल्याने वाडीकुरोली च्या सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी सरपंच पदासाठी सुप्रिया योगेश काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निर्णय अधिकारीडी. व्ही. शिंदे यांनीजाहीर  केली . उपसरपंच अर्चना पाटील ग्रामपंचायत सदस्य राजाबाई काळे अर्चना काळे सुनिता काळे लाडाबाई काळे कांताबाई सोनवले  शोभा कुंभार सारिका चव्हाण  उपस्थित होते.


 वाडीकुरोली ग्रामपंचायतीवर महिलाराज असून सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला आहेत सरपंच पदी निवड झाल्या नंतर सुप्रिया काळे म्हणाल्या की ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक  कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासाची परंपरा  पुढे चालू ठेऊ . गावामध्ये आरोग्य सोयीसुविधा व महिला व बालकल्याण व गावातील महिला बचत गटांना लघु उद्योग  उभारणीसाठी व त्या  स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक युवा गर्जना चे संस्थापक समाधान काळे माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील  पांडुरंग काळे बाबासो काळे  सत्यवान नाईकनवरे  पोपट काळे  राजेंद्र काळे अजित काळे निलेश काळे  ग्रामसेवक सावता शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.