*बार्डी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी दिनकर कवडे तर व्हा चेअरमन पदी दादासो पाटील यांची बिनविरोध निवड....!*

*बार्डी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी दिनकर कवडे तर व्हा चेअरमन पदी दादासो पाटील यांची बिनविरोध निवड....!*


करकंब /प्रतिनिधी:

- बार्डी ता पंढरपूर येथील बार्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या संचालक मंडळाची निवडणूक कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने व जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. 
बार्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दिनकर नामदेव कवडे तर व्हा चेअरमन पदी दादासो पाटील यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांगोलकर साहेब यांनी काम पाहिले.
यावेळी सचिव- विजयराज मोकळे, सरपंच-अभिजीत कवडे,भारतीय जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब आंबोरे सर, कालिदास कवडे सर, प्रकाश गायकवाड  , अनिल नाईक नवरे ,लक्ष्मण कवडे, उत्तम खंदारे ,सुनंदा कवडे ,आदिनाथ कवडे ,विठ्ठल घाटे आदीसह सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.