*करकंब येथील श्रीमंत सुधाकरपंत परिचारक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राजकुमार धायगुडे तर व्हा चेअरमन पदी नामदेव चेडे यांची बिनविरोध निवड....!*
करकंब /प्रतिनिधी
:-येथील श्रीमंत सुधाकरपंत परिचारक विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित करकंब च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या संचालक मंडळाची निवडणूक श्रीमंत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने व जिल्ह्याच्या अभ्यासू आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली.
या श्रीमंत सुधाकरपंत परिचारक विविध कार्यकारी सोसायटीचे
चेअरमन पाटील राजकुमार उर्फ बालाजी ज्ञानदेव धायगुडे तर नामदेव दत्तात्रय चेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांगोलकर साहेब यांनी काम पाहिले
या निवडीवेळी मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबुराव जाधव, नामदेव धायगुडे, सचिव विजयराज मोकळे, माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत देवकते, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस लक्ष्मण वंजारी, संजय मोहिते, ओबीसी चे जयंत टकले, उद्योजक अमोल शेळके, बिरू पारेकर, शिवाजी व्यवहारे सर, बाजीराव वंजारी, पांडुरंग शेटे, पांडुरंग सुरवसे आदीसह सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.