*मागणी केली... आणि काम झाले पूर्ण... *मोडनिंब येथील रेल्वे प्रशासनाचा जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या हस्ते केला मनसेकडून सत्कार*

पंढरपूर (प्रतिनिधी)
राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संस्थांनी मागणी करायची, आणि संबंधित विभागाने भाव खायचा .मग आंदोलने आली .दोन-चार आंदोलने झाली की ,कामास सुरुवात व्हायची. ही आजच्या कोणत्याही विभागाच्या प्रशासनाची वस्तुस्थिती आहे .यास फाटा देणारी घटना मोडनिंब येथे घडली आहे .मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी येथील रेल्वे प्रशासनाकडे काही कामांबाबतची मागणी केली ,आणि अवघ्या ५० दिवसांत काम पूर्णही झाले. या अभिनंदनीय कामाबद्दल येथील रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे अभिनंदनपर सत्कार मनसेकडून करण्यात आले.
मोडनिंब येथील आष्टी जलसिंचन योजनेच्या कॅनॉलचे काम रेल्वे क्रॉसिंगमुळे अनेक दिवसापासून अपूर्ण अवस्थेत होते. तसेच रेल्वेच्या चार आय.यु.बी. मध्ये पाणी साठल्यामुळे ते बंद होत होते .मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातही होत होते .या कामाबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी, ही कामे पूर्ण करण्याची रेल्वे प्रशासनास पत्राद्वारे विनंती केली होती. या पत्राची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तब्बल ५० दिवसांत ,गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आष्टी उपसा सिंचन योजनेच्या रेल्वे क्रॉसिंगचे काम उत्कृष्टरित्या पूर्ण केले आहे .याचवेळी शेटफळ ते मोडनिंब खंडोबा मंदिर या परिसरातील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे कामही जलद मार्गाने पूर्ण केले आहे . कल्पतरू हॉटेल ते मोडनिंब या मार्गावरील कॉंक्रिटीकरणनही करण्यात आले आहे.
मनसेच्या एका पत्राची दखल घेत अवघ्या ५० दिवसांत ही कामे रेल्वे प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहेत. या कामाबाबत मनसेकडून रेल्वे प्रशासनाचे पत्राद्वारे अभिनंदनही करण्यात आले आहे. याचवेळी रेल्वे प्रशासनातील मंडल रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता, सिव्हिल इंजिनियर प्रदीप बनसोडे, सहाय्यक मंडल इंजिनियर जोशी साहेब ,तसेच एसआयटी जोशी सो यांचा मनसेच्या वतीने अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ,शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राहुल सुर्वे , संतोष गोळवे,राजकुुुमार माने , राजकुुुमार भडगे, फिरोज मुजावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
*मोडनिंब मध्ये मालधक्याची गरज*
मोडनिंब ही मोठी बाजारपेठ असून ,या ठिकाणी दूरवरुन शेतकरी मोठ्या प्रमाणात माल घेऊन येत असतात .पुणे सोलापूर या महामार्गालगत मोडनिंबचे रेल्वे स्थानक आहे .या ठिकाणी मालधक्का व्हावा अशी आग्रही विनंती, प्रशांत गिड्डे यांनी यावेळी रेल्वे प्रशासनास केली आहे. याचवेळी गुलबर्गा तसेच मिरज या प्रवासी रेल्वेना मोडनिंब येथे थांबा मिळावा ,अशीही मागणी यावेळी करण्यात आली.