*माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत  रेश्मा टेळे यांच्या रूपाने, मनसेने सोलापूर जिल्ह्यात खाते उघडले*! *मनसे नेते दिलीप धोत्रे यांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल* *सोलापूर जिल्ह्यातील मनसेने वाट काढली, आता आगामी निवडणुकीकडे भलतेच लक्ष*

*माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत  रेश्मा टेळे यांच्या रूपाने, मनसेने सोलापूर जिल्ह्यात खाते उघडले*!  *मनसे नेते दिलीप धोत्रे यांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल*  *सोलापूर जिल्ह्यातील मनसेने वाट काढली, आता आगामी निवडणुकीकडे भलतेच लक्ष*

पंढरपूर/प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांच्या पत्नी रेश्मा टेळे या विजयी झाल्या आहेत,
मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेत्रत्वाखाली ही निवडणूक लवढवण्यात आली होती, 
माळशिरस नागरपचायतील मनसे च्या या विजयामुळे सोलापूर जिल्ह्यात मनसे ने आपले खाते उघडले आले त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मनसे मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.
यावेळी बोलताना दिलीपबापू धोत्रे म्हणाले की मनसेच्या  रेश्मा टेळे यांचा विजय म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांचा विजय असून मनसे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांनी कोरोना काळात सर्वसामान्य जनतेच्या    मदतीसाठी केलेल्या कामाची पोचपावती आहे, मतदारांनी जो विश्वास राजसाहेब ठाकरे आणि सुरेश टेळे यांच्या वर दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही यापुढे माळशिरस शहरातील सर्व जनतेच्या समस्या सोडवू असे धोत्रे म्हणाले,,
यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब करचे, कुंडलिक राजे मगर, सुदाम आवारे, आकाश होनमाने, सुरेश वाघमोडे, महादेव मांढरे ,मंगलाताई चव्हाण,नागेश इंगोले,माळशिरस शहर तालुक्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी उपस्थित होते,