*अखेर.,... शिव मल्हार न्यूज ने युवकामध्ये झाली क्रांती ...करकंब मध्ये शिवकालीन पाजर तलाव व पूर्व भागाची सर्वे मुळे जनजागृती,,..,!*

करकंब /प्रतिनिधी:
गेल्या 70 वर्षांपासून करकंब पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिवकालीन बेचाळीस एकरातील पाझर तलाव हा नेहमीच कोरडा पडलेला या शिवकालीन पाझर तलावावर गावातील अनेक बोअर अवलंबून असलेल्या त्यातच या परिसरातील शेतकरी तसेच या पूर्वभागातील या शिवकालीन पाझर तलावात सीना माढा उपसा सिंचन योजनेतून उचल पाणी घेऊन
पूर्व भागातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली तर हा पूर्वीपासूनचा दुष्काळग्रस्त असलेला भाग सुजलाम-सुफलाम निश्चित होईल . या उदात्त हेतूने शिव मल्हार न्युज करकंब या न्यूज पोर्टलने प्रथमता भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब आंबोरे यांच्याशी संपर्क साधून माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी स्वतः यासंदर्भात या शिवकालीन पाझर तलावास 70 वर्षानंतर भेट दिली. 70 वर्षानंतर भेट देणारे पहिले खासदार म्हणून त्यांचा करकंब व परिसरातील ग्रामस्थांनी प्रचंड गौरव करण्यात आला. व त्यांनी या कामासाठी आपली सकारात्मक भूमिका मांडली. त्यानंतरही करकंब येथील अजित्सिंह देशमुख व मित्रपरिवार यांनीही देशाचे नेते शरद चंद्र पवार यांची भेट घेऊन या पाझर तलाव व पूर्व भागातील पाण्याच्या बाबत सर्वे केल्याची माहिती देऊन मंत्रालयात बैठक घेण्याच्या बाबतचे नियोजन केले. त्यास आदरणीय शरद पवार साहेबांनी हिरवा कंदील दाखवला .आणि नामदार जयंत पाटील आमदार बबनदादा शिंदे यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक संपन्न झाली .आणि त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून करकंब येथे हा सर्वे सुरू असून करकंब च्या शिवकालीन पाझर तलाव तसेच पूर्व भागातील हजारो हेक्टर शेती निश्चितच ओलिताखाली येईल अशी आशा ेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामध्ये कुठलेही राजकीय मतभेद मनभेद कुणा मध्ये राहिलेले नाहीत. पाणी येणे हा एक गंभीर विषय बनला असून त्यादृष्टीनेसर्वजण एकत्र प्रयत्न करीत असल्याचे गावात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.: