*दाते मंगल कार्यालयातील सभेसाठी वाडीकुरोली एकवटली*! *समाधान काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठे शक्तिप्रदर्शनाने उपस्थित राहण्याची तयारी*

पंढरपूर, प्रतिनिधी
सध्या विठ्ठलच्या निवडणुकीने पंढरपूर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विविध नेतेमंडळी कडून आपापल्या परीने प्रचारात आघाडी घेण्यासाठी तयारी सुरू आहे. अशातच आज गुरुवारी दि2जून रोजी दाते मंगल कार्यालयात काळे-भालके-महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यासाठी काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असून ,वाडीकुरोली येथून या मेळाव्यासाठी सारे गाव एकवटले आहे. युवा नेते समाधान काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठे शक्तिप्रदर्शनाने उपस्थित राहण्याची तयारी केली आहे.
विठ्ठलच्या निवडणुकीत काळे गटही मोठा प्रभावी गट आहे. यामुळे या निवडणुकीत सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा निर्णयाला मोठी किंमत असणार आहे. सध्या तरी काळे ,भालकेआणि महाडिक गट एकत्रित निवडणूक लढविणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आजवरचा विठ्ठलच्या राजकारणातील इतिहास पाहता पूर्वीपासूनच स्व वसंतदादा काळे यांनीही मोठी भूमिका निभावली होती. यामुळे हा काळे गट मोठा निर्णायक गट म्हणून ओळखला जात आहे. वसंतदादा नंतर या गटाची जबाबदारी चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कल्याणराव काळे आणि समाधान काळे यांना यश मिळाले आहे.
आज होणाऱ्या या मेळाव्यासाठी काळे गट यांनी मोठे शक्तिप्रदर्शन दाखविण्याची तयारी केली असल्याने या निवडणुकीत काळे हे किंग ठरणार आहेत.
सध्या काळे, भालके आणि महाडिक गट एकत्रित लढण्याची तयारी करीत असल्याने संचालक पदासाठी उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुक काळे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.