*करकंब जिल्हा परिषद गटात कोण बाजी मारणार......!* *जिल्हा परिषद पंचायत समितीचे लवकरच बिगुल वाजणार.*

.करकंब /प्रतिनिधी :
-सध्या सोसायटी निवडणूका असो वा सोलापूर जिल्ह्याची नव्हे महाराष्ट्राची लक्ष वेधून घेतलेल्या श्री विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुकीचे पडघम गावागावात वाजू लागले असून आपला जिल्हा परिषद गट कसा आपल्या ताब्यात ठेवायचा यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील सर्वात चर्चेत व लक्षवेधी असलेला पंढरपूर व माढा तालुक्याचा सर्वात प्रतिष्ठेचा असलेला करकंब जिल्हा परिषद गटात कोण बाजी मारणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू असून सध्या करकंब जिल्हा परिषद गट जिल्ह्याचे अभ्यासू माजी आमदार व भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांत परिचारक यांच्या ताब्यात आहे. एकीकडे माढा पंढरपूर विधानसभा च्या दृष्टीने माढा पंढरपूर विधानसभेचे लोकप्रियआमदार बबन शिंदे हे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांनी दहा वर्षाच्या कार्य काळामध्ये मोठा जनसंपर्क निर्माण केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेत जाण्याचा लोक प्रतिनिधी नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न केल्यास सुकर होणार असल्याचे सर्वसामान्य नागरिकत्व बोलले जात आहे. त्यामुळे या करकंब जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्यात अटीतटीची लढत होणार ...? याकडे संपूर्ण करकंब जिल्हा परिषद गटाचे लक्ष लागून राहिले असून या करकब जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय आमदार बबन शिंदे यांच्या माध्यमातून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार व राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार याबाबत काय भूमिका घेतात. याचीही चर्चा सध्या करकंब जिल्हा परिषद गटासह पंढरपूर तालुक्यात सुरू आहे. असे असले तरी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील ग्रामीण भागामधील अनेक शेतकरी सर्वसामान्य नागरिक विशेषता महिलावर्ग यांना राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि काँग्रेस या महा विकास आघाडीचा आणि केंद्रातील भारतीय जनता पार्टीचा गेल्या काही वर्षात जो त्रास सहन करावा लागला.. पेट्रोल. घरगुती गॅस तसेच वाढती महागाई विशेषता ग्रामीण भागातील विजेच्या बाबतीत घेतलेले निर्णय यामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक विशेषता महिलावर्ग यांची झालेली कुचंबणा व त्यांची झालेली कुचेष्टा या हतबल झालेल्या मतदारांपुढे ग्रामीण भागात काय ?....व्हिजन ....घेऊन जाणार या कोड्यात नेते मंडळी सुद्धा आहेत. त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकी पक्षाच्या चिन्हावर लढवायच्या की समविचारी आघाडी काढून लढवायच्या.....? याचीही खलबते सुरू असल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आपल्या हातात जिल्हापरिषद असणे हे अत्यंत महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे त्याच पद्धतीने या मिनी मंत्रालयावर पक्षाचा झेंडा फडकवणार की समविचारी आघाडी करून जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालय हे येत्या काही काळा मध्येच दिसून येणार आहे.